जिल्हा व सत्र न्यायालयात ध्वजारोहण संपन्न

जालना,

जालना जिल्हा व सत्र न्यायालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तत्पुर्वी जालना तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रभारी वरीष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती एच.ए. अन्सारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी स्वामी रामानंदतीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी न्यायाधीश एन.व्ही. वीरेश्वर, न्या. एस.एस. पल्लोड, न्या. कांचन झंवर, न्या. एस.टी. चिकणे, न्या. एस.व्ही. चक्कर, न्या. एन.आर. अडकीणे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजीव देशपांडे,उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सचिव शारजा शेख, अरविंद मुरमे, जिल्हा सरकारी अभियोक्ता दिपक कोल्हे,प्रबंधक दिपक खुरसाले आदींसह विधीज्ञ,न्यायालयीन कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!