वाघ्रुळवाडी जि. प. शाळेत कवच कुंडल बैठक।

जालना,

कोरोना लसीकरण जनजागृती अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार वाघ्रुळवाडी जि.प .शाळेत बुधवारी ( ता. 15) शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत ची बैठक घेण्यात आली.

जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लसीकरण करून घेण्यासाठी गावात जनजागृती प्रभावीपणे करावी. या संदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात आला. या वेळी शालेय

व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव इंदलकर, उपाध्यक्ष संतोष मोरे, सरपंच सौ. अश्विनी इंदलकर, ग्रामसेवक सोनवणे, ज्ञानेश्वर इंदलकर शा. व्य. स. सदस्य पुंडलिक गायकवाड, सखाराम इंदलकर, बाबासाहेब शेळके, अंशीराम गायकवाड, ग्रा. पं.कर्मचारी नारायण घोलप, श्रीमती खंदारे, मुख्याध्यापक डि. बी. घुमरे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!