पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भक्तीगीत स्पर्धा
जालना,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त भक्तीगीत स्पर्धा व महिलांसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 6 या दरम्यान भाग्यनगर येथील गणपती मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी दिली.
गणेशोत्सवा निमित्त 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणार आहोत. यासाठी प्रत्येकीने आपल्या घरून अकरा किंवा एकवीस मोदक करून आणायचे आहेत. पहिली स्पर्धा उखाण्यांची होणार आहे. यात प्रत्येक महिलेने फक्त एकच उखाणा घ्यायचा आहे. तर दुसरी स्पर्धा भक्तिगीतांची घेण्यात येईल. त्यातील गीत गणपतीचे जर असेल तर त्याला जास्त प्राधान्य देण्यात येईल. या सगळ्या कार्यक्रमाची सांगता, बक्षीस समारंभ, आरती
या प्रभागाचे नगरसेवक अशोक पांगारकर आणि त्यांच्या पत्नी वैशाली पांगारकर यांच्या हस्ते महाआरतीने होईल. स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शुभांगी देशपांडे, आनंदी अय्यर, दीपा बिनीवाले, अर्पणा राजे, सुलभा कुलकर्णी, अरूणा फुलमामडीकर यांनी केले आहे.