कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा उपोषणाचा इशारा
जालना,
जालना बस स्थानक परिसरातील विश्रामगृहासह विविध मागण्यासाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने वारंवार निवेदने देऊन, विनंत्या करुन देखील वरीष्ठ अधिकार्?यांकडून दखल घेतली जात नसल्याने संघटनेने 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जालना आगारातील कर्मचार्?यांसाठी असलेले विश्रामगृह हे अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्या गृहाभोवती गवताने वेढा घातला आहे. शिवाय गवतामुळे डास वाढले आहेत, गवतातुन रात्री अपरात्री जातांना साप, विंचू आदीपासून धोका निर्माण झाला असल्याचे कर्मचार्?यांनी लेखी स्वरुपात वरिष्ठ अधिकार्?यांना दिले आहे. परंतु वारंवार सांगून आणि विनंत्या करुन देखील वरीष्ठ लक्ष देत नाहीत, मागण्या मान्य करीत नाहीत. त्यामुळे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने दि. 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर संघटनेचे सचिव णन.पी. तायडे यांच्यासह पदाधिकार्?यांच्या स्वक्षर्?या आहेत.