मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जालना,
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते टाऊन हॉल, जुना जालना येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार असुन तत्पुर्वी सकाळी 8.50 ते 8.55 या कालावधीमध्ये प्रमुखअतिथींच्या शुभहस्ते स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण व मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय ईमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण होणार आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सवार्ंनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे, सद्य:स्थितीतील कोविड -19 रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सवार्ंनी मास्क वापरणे,वारंवार हात सॅनिटाज करणे ,सामाजिक अंतर पाळणे इत्यादी आनुषंगीक बाबींचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.