उत्सवातून वृक्ष संवर्धनाची परंपरा जीवनदायी : राजेश राऊत जालन्यात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा ” श्री गणेशा ”
जालना,
भारतीय संस्कृतीतील सण, उत्सव हे पर्यावरणाशी निगडित असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेश जल्लेवार यांनी गणेशोत्सवात सुरू केलेली वृक्ष संवर्धनाची परंपरा जीवनदायी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी येथे बोलतांना केले.
गतवर्षी प्रमाणे यंदा ही समाजसेवक तथा भारतीय जनता पक्ष प्रणित दक्षिण भारतीय आघाडी सेल चे शहराध्यक्ष गणेश जल्लेवार यांनी स्वखर्चाने पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडूंच्या मुर्ती, कुंडी व वृक्षांचे वाटप गणेश चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी ( ता. 10) राजेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संजय देठे, माजी नगरसेविका सकुबाई पनबिसरे, आयोजक गणेश जल्लेवार, राजपाल पारचा, संतोष यादव, तुषार जल्लेवार, सुभाष अंबेकर, राजेश जल्लेवार, मनोहर गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेश राऊत पुढे म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी मर्यादा असल्याने गणेश जल्लेवार यांनी गतवर्षी लागवड केलेल्या वृक्षांची जपणूक केली. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरापासून वृक्ष जतनाची सुरूवात करावी. असे आवाहन ही राजेश राऊत यांनी केले.
संजय देठे या वेळी म्हणाले, पदाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेतून संकटात गोर- गरिब व गरजवंतांना मदतीचा हात देण्या सोबतच उत्सवात प्रबोधनासाठी गणेश जल्लेवार यांनी स्वखर्चाने राबविलेले उपक्रम लोकहिताचे आहेत. असे गौरवोद्गार संजय देठे यांनी काढले.
सुञसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर तुषार जल्लेवार यांनी आभार मानले. या प्रसंगी शाडूंच्या तीनशे मुर्ती, वृक्षांची रोपे, कुंड्या वितरित करण्यात आल्या.तसेच अमरधाम येथील स्मशान भुमीत वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमास सालोमन घोरपडे, विशाल सारसर, सुभाष रायपुरे, रवी अलगोंडा, राहुल श्रीरामवार, नंदकिशोर गंगूल, बालकिशन गुल्लपेल्ली यांच्या सह, महिला, नागरिक व तरूणांची उपस्थिती होती.
चौकट…
सहाशे वृक्षांचे संवर्धन : जल्लेवार
शक्ती, बुद्धी व मांगल्याचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून परिसरात गतवर्षी तीनशे वृक्षांची लागवड केली. त्यांचे प्रत्येकाने जतन केले असून यंदा ही तीनशे वृक्ष लागवड केली जात आहे. सर्व सहाशे वृक्षांचे बालकांप्रमाणे संवर्धन करण्याच्या आपला संकल्प असल्याचे गणेश जल्लेवार यांनी नमूद केले. कोरोना मुळे नैसर्गिक प्राणवायूचे महत्त्व कळाले असून प्रत्येकाने वृक्ष जतन करणे गरजेचे असल्याचे ही गणेश जल्लेवार यांनी सांगितले.