पाणी बचतीच्या लढ्यात एकत्र येऊन लोकचळवळ उभी करावी – आयुक्त डॉ. कल्लशेट्टी

जालना,

ग्रामस्थांनी पाणी बचतीच्या लढ्यामध्ये एकत्र येऊन एक लोक चळवळ उभी करण्याचे आवाहन भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांनी केले.

घनसावंगी तालुक्यातील यावल पिंपरी तांडा गावात आयोजित सभेमध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना  आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब उगले, यावल पिंपरी गावचे सरपंच रामनाथ पवार, औरंगाबाद विभागाचे उपसंचालक श्री. मेश्राम, वरिष्ठ खोदन अभियंता श्री. सुरडकर, जिल्ह्याचे प्र. वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, सहायक भूवैज्ञानिक श्री. चव्हाण, घनसावंगी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री. कापडणीस, घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार श्री. देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. रोडगे, गटविकास अधिकारी श्री. जाधव, उप अभियंता (यां) जिल्हा परिषद श्री. खरात तसेच अटल भूजल योजनेत समाविष्ट गावातील इतर सरपंचांची उपस्थिती होती.

आयुक्त श्री कल्लशेट्टी यांनी अटल भूजल योजनेचे आराखडे बनवणे तसेच अटल भूजल योजनेत असलेले लोकसहभाग यांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत यामध्ये गावकर्‍यांनी आपल्या गावातील पाण्याचा ताळेबंद तयार करावा. पाणी बचतीच्या विविध उपाय योजना राबवाव्यात. ठिबक आणि तुषारचे क्षेत्र गावामध्ये वाढवुन पाण्याची बचत करावी आदींबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!