25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
जालना प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना, जिल्हा न्यायालय जालना व सर्व तालूका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्यांतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन.आय. अॅक्टची प्रकरणे , बँकेची वसुली प्रकरणे ,कौटुंबिक वादाची प्रकरणे , मजुरी सबंधीच्या वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणांसह ईतर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणांसाठी दि.25 सटेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व संबधीतानी या सुवर्ण संधीचा फायदा घेवुन आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालत मध्ये ठेवुन तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.