शेतकर्यांसाठी आवाहन
जालना प्रतिनिधी,
हातवन बृ.ल.पा. प्रकल्प ता. व जि.जालना या प्रकल्पाला दि. 8 जुलै 2021 रोजी प्रथम सुधारित प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली आहे. प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे बुडीत क्षेत्रात बहुतांश शेतकरी वाढीव भुसंपादन मावेजाकरिता जमिनीत मोठया प्रमाणात झाडे लावणे, विहिरी खोदणे आदी कामे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनस्तरावरुन सदरील भागाचे ड्रोनदवारे सर्वेक्षण करणे सुरु असुन मागील 2 ते 3 वर्षाचे सॅटेलाईट नकाशे चठडअउ नागपुर यांचेकडुन मागविल्यानंतर तसेच ते तपासुन भुसंपादनाचा मावेजा देण्यात येईल. त्यामुळे शेतकर्यांनी बुडित क्षेत्रात अशा प्रकारे झाडे लावणे, विहिरी खोदणे इ. कामे करु नयेत, असे आवाहन करत भविष्यात या बाबी प्रकल्पाच्या भुसंपादनासाठी ग्राहय धरल्या जाणार नाहीत, असे कार्यकारी अभियंता, जालना लघुपाटबंधारे विभाग, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.