शासनाचे परिपत्रक असतांना फळबाग लागवडीसाठी गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांच्याकडून टाळाटाळ
जालना,
फळबाग लागवड पंचायत समिती स्तरावर करण्यात यावी असे शासनाचे परिपत्रक असतांना देखील जालना तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक फळबाग लागवड योजना करण्यासाठी शेतकर्यांना जाणून बुजून टाळत असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी आर्थिक दृष्टया सक्षम व्हावा या हेतूने शासनाकडून शेतीला जोड म्हणून फळबाग लागवड करावी असा वारंवार डंका वाजवला जातो. वाढते प्रदुषण रोखुन पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये वृक्षांची फार मोठी मोलाची भूमिका आहे. जालना जिल्ह्यातील वनक्षेत्राचे कमी असलेले प्रमाण वाढुन नैसर्गिकरित्या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात फळबाग व वृक्ष लागवडीची गती अत्यंत संथ असल्याने यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सुरू निघत आहे. जालना जिल्ह्याला वृक्षलागवडीचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला उद्दिष्ठ ठरवुन देण्यात आले आहे. परंतू जालन्याचे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी हे फळ लागवड या योजनेमध्ये शेतकर्यांना त्रास देण्याच्या हेतूने ग्रामसेवकांना आदेश देत आहे. गटविकास अधिकार्यांशी शेतकरी संपर्क साधतात मात्र ते उडवा उडवीचे उत्तर देऊन शेतकर्यांची दिशाभूल करत आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक शेतकर्यांनी प्रस्ताव दाखल केलेले असतांना देखील त्यांनी फळबाग लागवड प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता न दिल्यास जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा देखील निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर ज्ञानेश्भुसारे, गजानन आढाव, रघुनाथ कदम, सागर चव्हाण, प्रल्हाद ढवळे आदींच्या स्वाक्षर्या असून निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जालना व ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.