भ-ष्टाचारी शाखा उपअभियंता पांडुरंग टोम्पे विरूद्ध निलंबनाची कारवाई करा .उपोषणकर्ते अजय हिवाळे व अरूण खडसे यांची जिल्हाधिकार्‍याकडे मागणी

जालना,

शासनाचा विविध योजनेमधील विकासा कामांमध्ये जिल्हा परिषदेचे शाखा उपअभियंता पांडुरंग टोम्पे यांनी शासनाच्या निधीचा अपहार केला असून या सर्व कामांची चौकशी करून टोम्पे यांच्या विरूद्ध निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करत अजय हिवाळे व अरूण खडसे यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात उपोषकर्त्यांनी म्हटले आहे की, रेवगाव येथील दलित वस्तीमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज नाली, दलित समाज मंदिर दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळेवरील सालार, शाळेतील आरो फिल्टर व इतर कामात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या निधीचा अपहार पांडुरंग टोम्पे यांनी केला आहे. टोम्पे यांनी त्यांच्या कार्यकाळात सन 2018 ते आजपयर्ंत केलेल्या अधिकार क्षेत्रातील विकास कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता, गैरप्रकार व भ-ष्ट्राचार केलेला असुन शासनाच्या मार्गदर्शक सुचना व उददेशाला काळीमा फसवुण कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली आहे. व सिमेंटरस्ते, डांबरीरस्ते, इमारत बांधकम, अंडर ड्रेनेज व देखभाल दुरुस्ती इतर कामामध्ये भ-ष्ट्राचार केला आहे. तसेच काही कामे आगोदरच एखांद्या योजनुतून पूर्ण झालेले असतांनाही संबंधीत अधिकार्‍यांनी तेच काम इतर योजनेतु मंजुर करुन मोजमाप पुस्तिका खतवून सदरील कामाचे देयके हडप केले आहे. ज्या गावामध्ये जि. प. चे पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्हा व तालुका पातळीवर चांगले वर्चस्व असलेल्या लोकप्रतिनिधींच्या गावांध्यमे रस्ते दुरुस्ती, इमारत बांधकमा व दुरुस्ती, सिमेंट रस्ते इतर देखभाल कामांमध्ये प्रचंड गैरप्रकार, बोगसपणा झालेला आहे. दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रके तयार करतांना प्रत्यक्ष कामाचा परिमान ग्राहय न धरता अंदाजपत्रकामध्ये दुरुस्तीच्या कामामधील परिमान जास्त दर्शविले आहे. मोजमाप पुस्तिकेतील कामाची लांबी, रुंदी व उंचीचे परिमान व प्रत्यक्ष कामातील लांबी, रुंदी व उंचीचे परिमान यामध्ये मोठया प्रमाणात तफावत आहे. अंदाजपत्रके तयार करतांना प्रत्यक्ष कामाचा खर्च ग्राहय न धरता जास्तीचा काम दाखवून अंदाजपत्रकाचा खर्च वाढविण्यात आलेला आहे. शेडयुल बी प्रमाणे कामांसाठी वापरण्यात आलेले मटेरिअस साधन सामग्री ही न वापरता स्थानिक पातळीवरुन उपलब्ध करुन निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरुन शेडयुल बी मध्ये नमुद केलेले अंतर व दराचा निधी अपहार केला आहे. कामामध्ये वापलेल्या मटेरियलचा दर्जा व अंदाजपत्रकामध्ये वापरण्यात आलेल्या मटेरियलचा दर्जा यामध्ये मोठया प्रमाणात गुणवत्तेचे तफावत आहे. दुरुस्ती व देखभालीची कामे ही सर्रासपणे न करता, मोजामाप न करता मोजमाप पुस्तीकेवर खोट्या नोंदी घेवुन कामाचे देयके उचलून शासनाच्या निधीचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली आहे. विकास कामांमध्ये काँक्रीट करण्याकरीता वापरण्यात आलेल्या खडी, सिमेंट, वाळु यांचा दर्जा अंदाजपत्रकानुसार न वापरता माती मिश्रीत व मोठया साईजची खडी, लो ग्रेडचे सिमेंट वापरण्यात आलेले आहेत. तसेच ब-ासचे कॉन्टीडीटी ही अंदाजपत्रकानुसार न वापरता कमी प्रमाणात वापरलेली आहे. काही ठिकाणी कामामध्ये काँक्रीट करण्यामध्ये डब्बरचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष कामाचा दिनांक व मोजमाप पुस्तिकेवर दर्शविलेला दिनांक हया वेगवेगळया आहेत. या सर्व कामांची चौकशी करून जिल्हा परिषदेचे शाखा उपअभियंता पांडुरंग टोम्पे यांनी शासनाच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी त्यांच्या विरूद्ध निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!