सन 2020-21 वर्षातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी
जालना प्रतिनिधी
3 ऑगस्ट
सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थीनी शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता ऑनलाईन प्रणाली शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर मुदतवाढ देण्यात आलेली असून दि.05 ऑगस्ट .2021 पयर्ंत प्रवेशित अनु.जाती,विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज सादर करण्यात यावेत. तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज सुद्धा दि.05ऑगस्ट 2021 पुर्वी पडताळणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत व त्रुटी असलेले अर्ज तात्काळ विद्यार्थी लॉगिनवर पाठवुन त्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा. सदर प्रकरणी विद्यार्थी व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अमित घवले, सहायक आयुक्त , समाज कल्याण, जालना यांनी केले.