महीला व युवकांसह समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व न्यायहक्कासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती कटीबध्द राहीन – रविंद्रदादा जाधव.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी तसेच साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन प्रतिमापूजन व कोविड लाॅकडाऊन कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यां समाजसेवक आरोग्यसेविका यांना “कोविड योध्दा” पुरस्काराने सन्मान..
जळगांव : महीला व युवकांसह समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व कठीण काळात त्यांचे न्याय हक्कासाठी मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार निर्मुलन समिती कटीबध्द असेन तसेच महीला व युवकांच्या कलागुणांना चालना देवुन सामाजिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेवुन बचतगट व वयक्तीक उद्योग व्यवसायाकरीता कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँका व शासकीय महामंडळे यांचे विरुद्ध कायदेशीर मार्गाने जनआंदोलन केले जाईन तर कुठल्याही जाती-धर्मातील अन्यायग्रस्त व्यक्तिवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती कटीबध्द असेन असे प्रतिपादन समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांनी जळगांव येथिल स्व.शांताबाई पाटील सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात केले.
प्रथम लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन व्दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. विचारपिठावर आनिस च्या प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती प्रो.प्रेमलताताई जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.वसंतराव वाघ मामा, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रदीपनाना गांगुर्डे, रोटरी क्लब चे गणी मेननसर, धुळे जिल्हाध्यक्षा मुख्याध्यापीका शोभाताई नगराळे, नाशिक जिल्हा संघटक प्रदीप पगारे,उत्तर महाराष्ट्र संघटक मुकेश सोनवणे, धुळे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साळवे सर आदी.उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांनी आपले विचार मांडुन प्रबोधन केले. या प्रसंगी कोविड लाॅकडाऊन कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल समाजसेवक व आरोग्य कर्मचारी दिपाली कासार, संघपाल तायडे, मारिया आरोरा, प्रियंका पाटील, उषा बावीस्कर, महेंद्र पाटील, निखिलेश मिडे, सरिता खाचने आदींना शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प देवुन “कोविड योध्दा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक जळगांव जिल्हाध्यक्षा एँड.सिमाताई जाधव यांनी केले तर पाहुण्यांचा सत्कार स्वागताध्यक्षा जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मनिषाताई पाटील यांनी केले. सुत्रासंचालन सोनल कापुटे यांनी केले तर आभार नेहा जगताप यांनी मानले. कार्यक्रमास सर्वश्री पल्लवी भोगे, उर्वशी जाधव, नसरीन पिरजादे, सोनाली वायकोळे, इरफान शेख सचिन वायकोळे, जितेंद्र रायसिंग, दिक्षा गायकवाड, एँड.हर्षल पाटील, सुदीप पवार, जयश्री पाटील, एँड वैशाली बोरसे, अलका बागुल, फीरोजा शेख, पुष्पा निकम, दिलीप पवार, नाना पाटील, विशाल शर्मा, उज्वला सिंघवी, प्रमिला चव्हाण, आदींसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.