जळगाव मधील पाटील परिवाराकडून प्रथम कन्या जन्माचे आगळेवेगळे जल्लोषात स्वागत…समाजापुढे एक नवा आदर्श…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव.

जळगाव शहरातील – व्यंकटेश कॉलनी मधील रहिवासी व महिला पर्यावरण सखीमंच च्या कार्याध्यक्षा ,पतंजली महिला जिल्हा प्रभारी, ओबीसी संघटना च्या जिल्हा अध्यक्ष, अन्याय अत्याचार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष व गोदावरी गिरणी च्या संचालिका असलेल्या सौ मनीषा किशोर पाटील व किशोर पाटील या दाम्पत्यांनी त्यांची मोठी सून राधिका आनंद पाटील यांना मुलगी झाल्यावर त्यांना अत्यानंद होऊन आज त्यांनी नातीला घरी आणल्यावर आगळ्या वेगळ्या प्रकारे तिचे घरात स्वागत करण्यात आलेे.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नातेवाईक तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून सर्व कार्य क्षेत्रातून या उपक्रमाचे अभिनंदन होत आहे. समाजात मुलींच्या प्रति असलेला नकारात्मक भाव तसेच चाचणी करुन मुलगी असेल तर तो गर्भ पाडून टाकणे किंवा सूनेला त्रास देणे तसेच स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पाटील परिवार यांनी सकारात्मक रीतीने करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

पाटील परिवाराने या उपक्रमातून मुलीही तितक्याच श्रेष्ठ असतात किंबहुना मुलांपेक्षाही त्या जास्त श्रेष्ठ असतात असा संदेश अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी दिला. आपल्या नातीचे स्वागत त्यांनी मोठ्या जल्लोषात रंगबिरंगी फुग्यांनी व फुलांनी रांगोळ्यांनी, दिव्यांनी सजावट केलेल्या आपल्या अंगणात नातीला व सुनेला औक्षण करून फुलांच्या पायघड्या घालीत. गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात गृहप्रवेश करतांना एका थाळीत कुंकवाच्या पाण्यात नात शरयुचे कोऱ्या कापडावर पावलांचे ठसे उमटवून व पाच सुवासिनी द्वारा औक्षण करून या लक्ष्मीचे स्वागत केले आणि केक कापून हा आनंद साजरा केला.या बद्दल या परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मनीषा किशोर पाटील यांनी समाजा करीता संदेश दिलेला की मुलीचा जन्म झालेवर कुटुंबात आनंद उत्सव साजरा करून तिचे स्वागत करणे स्त्रीभ्रूनाची हत्या न होता मुलीनी जन्म घ्यावा, त्यांना निट वाढवले जावे, शिक्षण दिले जावे हे केल्याने मुली कुठल्याही भेदभावाशिवाय समान हक्क मिळवून या देशाच्या सक्षम, सबल नागरिक बनतील. वास्तविक मुली वाचवा मुली शिकवा एक चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!