ऑलम्पिंक स्पर्धा करीता भारतीय खेळाडूंना प्रोत्साहनासाठी ’ऑलम्पिक जागरण’ उपक्रमाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी

14 जुलै

टोकीयो येथे आयोजित ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय खेळाडू व महाराष्ट्रातील 10 खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरिता तसेच जिल्ह्यात खेळाविषयी वातावरण निर्मिती व्हावी, याकरिता 23 जुन ऑलम्पिंक दिनाचे औचित्य साधून 23 जुन ते 23 जुलै, 2021 या कालावधीत विविध कार्यकमांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी दिली आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालय, रावेर व जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ऑलम्पिंक जागरण हा उपक्रम 15 ते 20 जुलै, 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी 15 जुलै रोजी श्री. मारुती आडकर, ऑलम्पिंक वीर, कुस्ती, 16 जुलै रोजी श्री. हेमंत डोणगावकर, आंतरराष्ट्रीय खेळाडु व मार्गदर्शक, 17 जुलै रोजी श्रीमती कविता राऊत, ऑलम्पिंक अ‍ॅथलेटीक्स, 18 जुलै रोजी श्री. नवनाथ फरताडे, वर्ल्ड चॅम्पियन शुटींग, 19 जुलै रोजी डॉ. श्री. प्रदीप तळवेलकर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तर 20 जुलै रोजी श्री. योगेश दानवे, कॉमनवेल्थ मेडलीस्ट, ज्युदो हे माजी ऑलम्पिंक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारार्थी त्या त्या दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात ऑनलाईन झूम अ‍ॅप, यु टयुब लाईव्ह या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे.

कार्यक्रमात सहभागींना वैयक्तीक माहिती भरुन उपक्रमात सहभागी होवून ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्रही प्राप्त करता येणार आहे.

या उपक्रमाचे उद्धाटन 15 जुलै रोजी प्रा. श्री. ई. वायुनंदन, कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे हस्ते ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!