जनमत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर संपन्न
जळगाव प्रतिनिधी –
” रक्ताचं नातं अभियान “अंतर्गत रविवार दिनांक 11 जुलै 2019 रोजी बेंडाळे कॉलेज समोरील कोटा क्लास येथे रक्तदान शिबिर व विनामूल्य covid-19 ॲन्टीजन तपासणी शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सरिताताई कोल्हे माळी होत्या.रक्तदान शिबिराचे उद्घाटन जळगाव महानगर पालिकेच्या महापौर मा.सौ.जयश्रीताई महाजन यांनी केले.दैनिक लोकमत व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जनमत प्रतिष्ठानच्या नेतृत्वात घेतलेल्या शिबिराच्या आयोजनात भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह,जळगाव यांचे अनमोल सहकार्य मिळाले.मान्यवरांचे स्वागत पोलीस सेवा महिला संघटना जिल्हाध्यक्षा श्रीमती हर्षाली पाटील व श्रीमती प्रतिभा मेटकर , जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी केले.इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा रक्तपेढीचे ज्येष्ठ डॉ. ए.डी.चौधरी,टेक्निशियन किरण बाविस्कर व श्रीमती रूपाली बडगुजर सहकारी राहुल पाटील यांचा सत्कार महापौर सौ.जयश्रीताई महाजन व सरिता ताई कोल्हे माळी यांच्या हस्ते झाला.
प्रस्तावना,सुत्रसंचलन पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी म.न.पा.जळगाव नगरसेविका सौ.निताताई सोनवणे,महर्षि वाल्मिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा विवेक सोनवणे यांचे आयोजनात्मक अनमोल मार्गदर्शन मिळाले.शिबिरास राहुल कोळी,सागर कोळी ,कोटा क्लासेसचे राजेंद्रकुमार वर्मा सर,संजयकुमारसिंग सर,विजय पाटील सर मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन संतोष भारंबे सरांनी केले.