राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने बंजारा कॉलनी (सुप्रिम कॉलनी) येथे कै.वसंतरावजी नाईक यांची १०८ वी जयंती उत्साहात साजरी.
दि.१.-जळगाव शहरातील बंजारा(सुप्रिम कॉलनी )येथील रामदेवजी बाबा मंदिरावर राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,बंजारा समाजभुषण,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री-कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांची १०८’वी जयंत अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी,संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकजी पवार यांच्या हस्ते बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस व कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या प्रतिमेस संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार आणि प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड माल्यार्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव यांनी कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या जिवनकार्याविषयी तसेच सामाजिक व राजकीय जिवनात केलेल्या कार्याबद्दल उपस्थित कार्यकर्ते व समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
आणि नवीमुंबई येथील प्रस्तावित विमानतळाला कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांचे नाव देण्यात यावे असा ठरावा देखील करण्यात आला.
हरितक्रांतीचे प्रणेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा सिडको तथा नवीमुंबई चे निर्माते हे मा.मुख्यमंत्री बंजारा समाजभुषण-कै.वसंतरावजी नाईकसाहेब हेच आहेत आणि या विमानतळाला कै.नाईकसाहेब यांचेच नाव देण्यात यावे असे मत तथा मागणी मा.आत्मारामभाऊ जाधव यांनी केली.
या मागणीला उपस्थित कार्यकर्ते व समाजबांधवांनी टाळ्यांच्या आवाजात प्रतिसाद दिला.यावेळी कॉलनीतील असंख्य समाजबांधव तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.