आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी -दि. 22

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दुर व्हावा, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक, युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिग व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी शासनातर्फे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील एकूण 600 बेरोजगारांना जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व शासकीय उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये येथे विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार असुन हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्याअन्वये त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी
गुगल लिंक : https://docs.google.com/forms/d/e/१FAlpQLSeVl८ym५YkK-
vS०४lVYKRIOCbvh Dr४ioO६५३९L९०HCyjuJAQ/viewform?usp=sf link या लिंकवर आपली माहिती/नोंदणी ऑनलाइन करावी.
नोंदणी करतांना कोर्स समोर नमुद शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कोर्स/ जॉबरोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. राजपाल म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!