स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेने घेतला पुढाकार….
मुलींच्या व युवतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी. उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
जळगाव –
महिला भगिनी स्वतः चे संरक्षण स्वतः करू शकल्या पाहिजेत. विशेषतः ग्रामीण भागातील मुली, युवती शिक्षण,नोकरीकरिता बाहेर गावी जातात.राञी अपराञी एकट्या येण्याची वेळ त्यांच्यावर येते.पोलिस यंञणा कितीही सज्ज असल्यात तरी, प्रत्येक वेळी संरक्षणार्थ पोहचू शकणार नाहीत. मुलींवरील युवतींवरिल अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यासाठी त्यांना सक्षम करणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने या सर्व बाबींचा विचार करून ८ वी ते पदवीधर वर्गांपर्यंत मुलींकरिता कम्प्लसरी या विषयात कराटे शिक्षणाचा अंतर्भाव करावा. अशा मागणीचे निवेदन जळगाव जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना देण्यात यावेळी स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक,अध्यक्ष पल्लवी भोगे (पाटील) उपाध्यक्ष उर्वशी जाधव,युवाध्यक्ष जयेश चौधरी उपस्थित होते.