जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस शिक्षक आघाडीतर्फे दिव्यांग बंधूंच्या समस्यांसंदर्भात निवेदन !

जळगाव प्रतिनिधी – ( सागर पाटील सर mob.- 9422576484 )

३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस शिक्षक आघाडी जळगाव महानगर तर्फे दिव्यांग बंधूंच्या समस्या संदर्भात महानगरअध्यक्ष मा. श्री.अशोकभाऊ लाडवंजारी यांना निवेदन देण्यात आले. अशोक भाऊंनी आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या सर्व बंधूच्या समस्या लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले. नंतर अशोक भाऊंच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक आघाडीचे श्री.विजय विसपूते सर गेल्या १७ वर्षापासून दिव्यांग बांधवाच्या हक्कासाठी लढा देत आहेत.सदर कार्यक्रमास शिक्षक आघाडी मार्गदर्शक श्री.वाय एस महाजन सर , जिल्हासरचिटणीस अशोक पाटील ,मराठा मंदिर विद्यावर्धीनीचे मुंबई सचालक सुदाम पाटील , अध्यक्ष श्री.हेमंत सोनार,सचिव श्री.प्रवीण धनगर,सरचिटणीस श्री.सागर पाटील तसेच श्री.विजय विसपुते , सुनिलभैय्या माळी , रमेशजी बारे , सुशील शिदे , रामधन पाटील , अकिलभाई पटेल , विशाल देशमुख , राजु बावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!