अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा….
अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते..
उत्तम आरोग्यासाठी कोजागिरी च्या रात्री व्रत केली जाते..
जळगाव —
ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला “शरद पौर्णिमा” असेही म्हणतात काही ठिकाणी “नवान्न पौर्णिमा” व “मानीकेथारी पौर्णिमा” असे म्हणतात या दिवशी जागरण करून लक्ष्मीदेवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला “कोजागिरी पौर्णिमा” असेही संबोधले जाते
अश्विन पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या द्वारा भूतलावर लक्ष्मीदेवी प्रकट झाल्या ,द्वापर युगात वृंदावनात श्रीकृष्ण भगवंतांनी गोपीकां सोबत याच रात्री रासlila केली होती श्री स्वामिनारायण भगवंतांनी पंचाळा गावी संत भक्तांसह रास लीला केली होत त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून भक्तजन या दिवशी रास उत्सव साजरा करतात
कोजागिरी पौर्णिमाच्या रात्री चंद्र आपल्याला संपूर्ण १६ कलांमध्ये दिसतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो
चंद्राच्या या गुणांमुळेच “नक्षत्रानां अहं शशी” म्हणजे नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवत्गीतेत सांगितले आहे
अश्विन पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या द्वारा भूतलावर लक्ष्मीदेवी प्रकट झाल्या
भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पूर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे या दिवशी देवी नारायणा सह गरुडावर आरूढ होऊन पृथ्वीतलावर येते लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात
या दिवशी दूध आटवून त्यात केसर पिस्ते बदाम चारोळी वेलदोडे जायफळ साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध मग प्राशन केले जाते
कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मीदेवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मी देवींचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात जी माणसे जागरण करत नाहीत त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते
या दिवशी श्रीसूक्त कनकधारा स्तोत्र विष्णुसहस्त्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते
शरद पौर्णिमेच्या दिवशी करायाच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते.
( शास्त्री नयनप्रकाशदासजी )
स्वामीनारायण मंदिर
जळगाव – महाराष्ट्र