भादलीं ब्रू येथील रूरल एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात आज १५ जून

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

आजपासून बरोबर ७४ वर्षांपूर्वी १५ जून १९४७ रोजी रुरल एज्युकेशन सोसायटी भादली बुद्रुक ता जि जळगाव या संस्थेतर्फे श्रीराम इंग्लिश स्कूल चे वर्ग लेवा पंच ट्रस्ट चे श्रीराम मंदिरावर वरील मजल्यावर, श्री हनुमान मंदिरावर सुरू करण्यात आले
कै डॉ सुभानराव पाटील यांना महात्मा गांधी सेवा ट्रस्ट नावाने दवाखाना सुरू करावयाचा होता त्याकरिता त्यांनी सध्याच्या हायस्कुल ची जागा मिळविली होती.
शैक्षणिक संस्थेचे लेवा पंच विश्वस्थानी- कै भिका भाना पाटील,कै श्रीधर झंडू अत्तरदे,कै काळू बापू महाजन,कै खाचणे,जागेची गरज असल्यामुळे कालांतराने रुरल एज्युकेशन सोसायटी व महात्मा गांधी सेवा ट्रस्ट यांनी एकत्र येऊन शाळेला’ महात्मा गांधी विद्यालय ‘ असे शाळा अस्तित्वात असे पर्यंत तहहयात नाव कायम ठेवले जाईल;असे ठरवून जागा शाळा सुरू करणे करिता गांधी सेवा ट्रस्ट ने एज्युकेशन सोसायटीला हस्तांतरित केली .
शाळेचे प्रथम मुख्याध्यापक म्हणून कै रुपचंद काळू नारखेडे यांनी सेवा दिली.
आज शाळा ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असताना
महात्मा गांधी चे पुतळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष श्री एम जी नारखेडे सर यांचे शुभहस्ते पूजन करण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिक डॉ सुभानराव तोताराम पाटील यांचे प्रतिमा पूजन संस्था अध्यक्ष श्री गोविंद महाजन सर, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै श्रीधर झंडू अत्तरदे यांचे प्रतिमा पूजन ऑ सेक्रेटरी सुनील नारखेडे.,कै भिका भाना पाटील यांचे प्रतिमा पूजन उपाध्यक्ष श्री एम जी नारखेडे सर ,कै काळू बापू महाजन यांचे पुतळा पूजन श्री आर जी नारखेडे सर,कै धोंडू दोधु खाचणे यांचे प्रतिमा पूजन श्री प्रकाश अत्तरदे यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी संचालक सर्वश्री उमाकांत जावळे सर,यशवंतराव खाचणे,सुधाकर नारखेडे सर,म.गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी के धनगरसर, श्रीमती मी रा महाजन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चेतन गाजरे सर व सर्व शाळांचे स्टाफ सदस्य उपस्थित होते.

सुत्रसंचलन श्री बागुल सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ शुभांगी पाटील मॅडम यांनी केले.

प्रत्येक शहरवासियाला वाटते की आपण या शहराचं देणं लागतो. इच्छा असते सुंदर.. स्वच्छ.. हरित जळगावची! यासाठीच आपल्या परिसरातील नागरी समस्या / तक्रारी “महापौर सेवा कक्ष” – 95 90 269 269 या हेल्पलाईन क्रमांकावर आजच कॉल करून नोंदवा आणि आपल्या स्वप्नातल्या जळगावकडे मार्गक्रमण करा. आपण नोंदविलेल्या तक्रारींमुळे आपल्या परिसरातील नागरिकांचा सुद्धा फायदा होईल. “महापौर सेवा कक्ष” येथे आलेल्या समस्यांचा/तक्रारींचा पाठपुरावा तत्परतेने करून त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!