महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न..

जळगाव प्रतिनिधी —

महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 8 ऑक्टोंबर 2021 रोजी गणगोपी अपार्टमेंट ई विंग जैन पेट्रोल पंप मशिद जवळ खुल्या जागेत वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर आमदार जळगाव शहर तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण मा. राजूमामा भोळे उपमहापौर मा. कुलभूषण पाटील नगरसेवक मा. अश्विन सोनवणे निसर्ग पर्यावरण राज्य समन्वयक मा. नाना पाटील ॲड मा. हरून देवरे ,सुरेंद्र पाटील , वसंत पाटील, ॲड दिलीप बोरसे हे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजनात वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. यानंतर महिला पर्यावरण सखी मंच तर्फे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. वड, पिंपळ, काशीद, बदाम, अर्जुन, कडुलिंब, बेहडा, शिसम या वृक्षांची लागवड करण्यात आली मा. नाना पाटील यांनी वृक्षांची लागवड कशी करावी तसेच महिला पर्यावरण सखी मंच यांच्या 6000 वृक्षलागवड केलेल्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले. वसंत पाटील यांनी अर्जुन व तुळस या झाडाचे महत्त्व विशद केले. आमदार माननीय राजूमामा भोळे यांनी वृक्ष संवर्धन व संगोपन यावर भर टाकून वृक्षांमध्ये फळाचा ही समावेश असावा असे मार्गदर्शनातून सांगितले व वृक्ष लागवड केलेल्या जागेसाठी लवकरच कुंपण घालून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी ॲड वैशाली बोरसे ॲड दिलीप बोरसे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला पर्यावरण सखीमंच अध्यक्ष मनीषा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले. आभार शहराध्यक्ष पर्यावरण सखी मंच नेहा जगताप यांनी मानले. याप्रसंगी पर्यावरण सखी मंचच्या सौ नूतन तासखेडकर, रेखा निकुंभ माधुरी शिंपी, ढेपे मॅडम, छाया पाटील व मंत्री मॅडम इत्यादी महिला सखी वृक्ष मित्र पर्यावरण मित्र यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!