पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…

जळगाव मधील आव्हाने शिवारातील संत सावता नगरात- (शेतकी शाळे मागील परिसरात) ओपन स्पेस वर वृक्षारोपण करून परीसरात सुशोभि करण करण्यात आले
जळगाव शहराच्या सन्माननीय महापौर सौ जयश्रीताई महाजन , उपमहापौर श्री कुलभूषण पाटील , शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख श्री आबासाहेब शरद तायडे, प्रभाग समिती क्रमांक 1 च्या सभापती सौ प्रतिभाताई पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ सरिता ताई कोल्हे, श्रीआप्पासाहेब सुधीर पाटील, व परिसरातील नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

या वेळी श्री चंद्रशेखरजी नेवेसर यांनी वृक्ष उपलब्ध करून दिली, श्री सोमनाथ महाजन यांनी संपूर्ण वृक्ष जगविन्याची व देख भाल करण्याची हमी घेतली,
सौ महापौर जयश्रीताई महाजन यांनी आपले मनोगत मध्ये सांगितले की आपला परिसर शहरापासून दूर असून देखील आपण या परिसरात बिल्डरांच्या माध्यमातून संपूर्ण ओपन स्पेस सुशोभित करून घेतला अश्याच प्रकारे जर शहरात वृक्षारोपण झाले तर शहर ,खूप छान व हिरवेगार होईल.

आपण वृक्षारोपण करून परिसर सुशोभित करीत आहात तर त्याच संवर्धनसुद्धा करणं ही काळाची गरज आहे. म्हणून जसे झाड लावतो तसे त्याचे संवर्धन करून त्याला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून आपण लावलेले वृक्ष पुढच्या काळात रूबाबात डोलतांना आपल्याला पाहायला मिळेल.
सर्व आलेल्या मान्यवरांचे स्वागत वृक्ष- कुंडी देऊन करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिक ,श्री मधुकर आबा पाटील ,श्री बडगुजर सर, श्री बोदडे दादा, श्री परदेशी सर, श्री उत्तम भाउ सोनवणे,श्री राजेंद्र महाजन , श्री किरण पाटील सर, अर्जुन संदांशिव सर, वसंत पाटील- स्वामी समर्थ केंद्र पर्यावरण प्रतिनिधी , व परिसरातील नागरिक उपस्थित होते,

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!