अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून विशेष मोहिमेचे आयोजन
जळगाव,
अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यो. कों. बेंडकुळे यांनी दिली आहे.
अन्न व्यवसाय करण्यासाठी त्यांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमांतर्गत परवाना, नोंदणी घेवूनच अन्न व्यवसाय करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना, विना नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून त्यामध्ये 5 लाख रूपयांपयर्ंत दंड व सहा महिने कारावासाची तरतूद आहे.