विजय लुल्हे यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा प्रकाशन वितरण कार्यवाह पदी नियुक्ती.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी.

तरसोद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांची जळगाव येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे प्रकाशन वितरण कार्यवाह जळगाव जिल्हा प्रमुख पदी सन २०२० ते २०२१ दोन वर्षासाठी नियुक्ती झाली आहे .
विजय लुल्हे विद्यार्थीभिमुख शैक्षणिक उपक्रम , दीनदलितांसाठी शाळाबाह्य सामाजिक उपक्रम , वृक्षारोपण व पर्यावरण प्रदुषण निर्मूलन , वाचन संस्कृती संवर्धनासाठी शिक्षकांची पुस्तक भिशी चळवळ राबवित आहेत . कोरोना महामारीकाळात विस्थापित व स्थलांतरीत बेरोजगारांना अन्नदान,उतारकरू व झोपडपट्टी परिसरात मास्क वाटप व सॅनेटराईझ वाटप ,बालकांना दिवाळी फराळ व कपडे वाटप , निराधार वयोवृद्धांना यथोचित आर्थिक मदत असे उपक्रम राबविले .या कामाची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगावचे जिल्हा कार्यवाह ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर कट्यारे यांनी विजय सुपडू लुल्हे यांची प्रकाशन वितरण कार्यवाह जळगाव जिल्हा प्रमुख पदी सन्माननीय नियुक्ती केली आहे . नुकतीच कट्यारे यांनी विस्तारीत जिल्हा कार्यकारिणी घोषित केली .
यापूर्वीही विजय लुल्हे यांनी जिल्हास्तरावर समितीच्या विविध उपक्रम विभाग, विज्ञान परीक्षा तसेच तालुका कार्याध्यक्ष जबाबदाऱ्या पार पाडतांना तसेच राज्याच्या नियोजीत विविध अभियानांतर्गत उपक्रम, शासनाच्या चुकीच्या निर्णया विरोधातील प्रासंगिक धरणे – आंदोलन , बुवाबाजी भंडाफोड प्रकरणांत सक्रिय सहभागाने कर्तव्यनिष्ठेची छाप पाडली आहे .

प्राथमिक शिक्षकांची ” वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण ” सेवांतर्गत तालुकास्तरीय शिबिरे व परीसरात प्रात्यक्षिकांसह व्याख्यानांचे आयोजन करून प्रबोधन केले आहे .लुल्हे यांनी झपाटल्याप्रमाणे अल्पावधीत जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राचे १००० वर्गणीदार करून समितीचे कार्य व विचार तळागाळापर्यंत पाहोचविले आहे .विशेषतः कमिशन असूनही त्यांनी नम्रतापूर्वक कमिशन नाकारले .लुल्हे यांच्या निःस्वार्थी व समर्पणशील कार्याची दखल घेऊन धुळे येथील खान्देशस्तरीय द्विदशपूर्ती परिषद सन – २००९ ( डिसेंबर ) मध्ये महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते विजय लुल्हे यांना ” शतकवीर पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले आहे . आतापर्यंत लुल्हे यांना अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मुक्त पत्रकार म्हणून काही काळ त्यांनी काम करतांना दीनदलित व अन्याय अत्याचारितांच्या अन्यायाला व शैक्षणिक समस्यांना वाचा फोडून त्यांना यथोचित न्याय मिळवून दिला आहे .
प्रकाशन वितरण कार्यवाह जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल विजय लुल्हे यांचे समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस विनायक सावळे , मानसकेंद्र राज्य प्रमुख डॉ. प्रदीप जोशी , अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक नितीन शिंदे ,निवृत्त उपसंचालक ( प्राथमिक विभाग ) तथा साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर , निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड,निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर ,कवयित्री माया धुप्पड ,केंद्रप्रमुख अशोक तायडे , विस्तार अधिकारी प्रतिमा सानप , ललीत कला केंद्र चोपडा प्राचार्य राजेंद्र महाजन , प्रकाशक युवराज माळी ,संपादक शिवाजीराव शिंदे ,दीपक महाले, विश्वजीत चौधरी ,चित्रकार सुनिल दाभाडे मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले आहे
.

वृक्ष संवर्धन काळाची गरज
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!