*आरोग्य सांभाळायचे असेल तर सायकलिंग करा जिल्हा नियोजन अधिकारी व सायकलिस्ट प्रतापराव पाटील
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी
आज जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, 150 किलोमीटर सायकलिंग पूर्ण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी प्रतापराव पाटील बोलतांना म्हणाले की जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल, शरीर व मन स्वस्थ ठेवायचं असेल, आजारांना लांब पळवायचे असेल, औषधी व गोळ्या खायच्या नसतील तर सकाळी लवकर उठा व सायकलिंग करा.
“जळगाव वुमेन ऑन व्हील्स” या नुसार जळगाव शहरातील महिला सायकल पटू सौ.कामिनी धांडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा नियोजन अधिकारी व सायकलपटू प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाच्या अनुषंगाने 3 फेब्रुवारी ते 4 मार्च 2021 या कालावधीत कमीत कमी 15 दिवस व दररोज कमीत कमी 10 किमी असे 15 दिवसांत कमीत कमी 150 किलोमीटर कींवा त्यापेक्षा अधिक अंतर पूर्ण करणेबाबत आव्हान देण्यात आले होते. यात एकूण 27 महिलांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी 25 महिलांनी 150 किमी व त्यापेक्षा अधिकचे अंतर या दिलेल्या दिवसात पूर्ण केले त्यानिमित्ताने 150 किलोमीटर अंतर पूर्ण करणाऱ्या महिलांचा जागतिक सायकल दिनानिमित्त मेहरून तलावावरील ट्रॅकवर जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील व संजय पाटील लीला डिस्ट्रीब्यूटर व डिजिटल फोटो लॅब चे संचालक यांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा.डॉक्टर दीपक दलाल, प्रा डॉ.किशोर पवार, रुपेश महाजन, सुनील चौधरी, कामिनी धांडे, संभाजी पाटील, अतुल सोनवणे, अनुप तेजवाणी, मृगांक निशाणदार, इरफान पिंजारी, अमोल देशमुख, मोतीलाल पाटील, हे उपस्थित होते. महिलांमध्ये सायकलींचा उत्साह वाढावा म्हणून त्यांना प्रमाणपत्र व मेडल संजय पाटील लीला डिस्ट्रीब्यूटर व डिजिटल फोटो लॅब जळगाव चे संचालक यांनी उपलब्ध करून दिले होते तसेच निखिल लुधियाना सायकल औरंगाबाद यांनी सर्व महिलांना सायकल बॉटल स्टॅन्ड यानिमित्ताने भेट म्हणून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष पवार यांनी केले.
याप्रसंगी स्नेहा लूनिया, विद्या बेंडाळे, डॉ. अनघा चोपडे, मनीषा पाटील, कविता पाटील, डॉ. सुषमा पाटील, अनिता काबरा, संजना बाईड, योगिता घाटोळ, चारुलता पाटील, प्रिया झवर, हेतल चव्हाण, आरती व्यास, अमृता अमळनेरकर, छाया ढोले, इशिका महाजन, कीर्ती कोल्हे, डॉ. मेघना नारखेडे, पूजा काळे व कामिनी धांडे यांचा प्रमाणपत्र मेडल व सायकल पाणी बाटली स्टॅण्ड देऊन सत्कार करण्यात आला.