६०,००० जळगावकरांनी केले भारतमाता प्रतिमा पूजन

जळगाव,

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त: अभाविपने राबवले ११० गावात ३५ उपक्रम.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशातर्फे हर घर तिरंगा – घर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सुमारे साठ हजार नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. या अभियानात जिल्ह्यात सर्वत्र ध्वजारोहण, तिरंगा फेरी, भारत माता प्रतिमापूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे, वृक्षारोपण, शहीद वंदना, वीरमाता वीरपत्नी सत्कार,असे उपक्रमही पार पडले.
जळगाव अभाविपच्या वतीने जिल्ह्यातील ८ तालुक्यात ११० गावात १२१२० घरात भारत माता प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. या अभियाना अंतर्गत साठ हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमा पूजनात सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे बस स्थानक, ट्राफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालय, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, गणेश मंडळे या ठिकाणी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. यामुळे शालेय विद्यार्थ्यी व नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला. जळगाव जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक ठिकाणी ध्वजारोहन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हे अभियान अभाविपने भारत भर राबवले. त्याचप्रमाणे या अभियानात जळगाव मध्ये ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मशाल यात्रा, परिषद की पाठशाला याठिकाणी वेशभूषा यात्रा, १६५ चौकात समोहिक भारत माता पूजन, ध्वजारोहण करण्यात आले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी १०० विद्यार्थी ६४ विद्यार्थिनी पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती अभियान जिल्हाप्रमुख इच्छेश काबरा व आकाश पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!