जनसेवा ही ईश्वर भक्ती बोध यातला उमजू या
वरणगाव प्रतिनिधी
“जनसेवा ही ईश्वर भक्ती बोध यातला उमजू या” या उक्तीप्रमाणे कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागील दीड वर्षांपासून काम करत आहे
कोरोना ची दुसरी लाट आली आणि भयावय स्थिती तयार झाली. कोणाचा नैसर्गिक मृत्यू जरी झाला तर सर्वांच्या मनात पहिली भीती की कोरोना मुळे तर झाला नसेल असे प्रश्न पडतो. पण या संकटकाळात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जिथे कमी तिथे आम्ही या तत्वावर काम करत आहे
फुलगांव येथील चंद्रभागा सीताराम सुतार वय 65 वर्ष या अनाथ महिलेचा मृत्यू झाला. मृत्यू चे कारण स्पष्ट नसल्यामुळे कोणीही अंत्यसंस्कार करायला पुढे येत नव्हतं. अशातच ही माहिती वरणगांव येथील स्वयंसेवकाना कळताच त्यांनी तात्काळ धावून महिले सोबत असलेल्या दोन नातेवाईकांना सोबत घेऊन धीर दिला. आणि अंत्यसंस्कार ची सर्व प्रक्रिया पार पाडली. स्वयंसेवकांनी कोरोनाचे सर्व दिशा दर्शकाचे पालन करून महिलेवर हिंदू रितिरिवाजा नुसार अंत्यसंस्कार केले. या कामात हितेश भंगाळे, गौरव श्रीखंडे, नथ्थु कोळी, भरत चंदने इत्यादी या स्वयंसेवकानी पुढाकार घेतला.
कोरोना च्या दुसऱ्या लाटे नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वरणगांव यांनी गरजूंना रक्त पुरवणे, प्लाजमा पुरवणे, लसीकरणा बद्दल दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देणे असे अनेक उपक्रम राबवत आहे.