मायक्रोसॉफ्टचे जागतीकस्तरावर तीन अब्ज गेमर्ससह टॉप करण्याचे लक्ष्य – नडेला

सन फ्रॉस्किो

28जुलै

मायक्रोसॉफ्ट कंपनी जागतीकस्तरावर आपल्या लाखो गेमर्स पर्यंत पोहचण्यासाठी आपल्या गेमिंग रणनीतीचा विस्तार करत असून मनोरंजन उद्योगामध्ये गेमिंग सर्वांत मोठी श्रेणी आहे आणि कंपनीचे लक्ष्य जगातील तीन अब्ज गेमर्स पर्यंत पोहचण्याचे आहे जेथे ते खेळत आहेत असे मत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेलानी व्यक्त केले.

नडेलानी मंगळवारी एका अर्निंग कॉलच्या दरम्यान म्हटले की आपण सर्वजण खेळात सहभागी आहोत आणि मागील महिन्यात ई-3मध्ये आम्ही 27 नवीन पुरस्कारांची घोषणा करत आम्ही आता पर्यंच्या सर्वांत मोठया गेम लाइनअपला लाँच केले जे सर्व गेमर्ससाठी उपलब्ध असेल.

त्यांनी म्हटले की ग-ाहक जवळपास 40 टक्के  अधिक गेम खेळत आहेत आणि गैर सदस्यांच्या तुलनेत 50 टक्के अधिक खर्च करत आहेत. आम्ही मागील महिन्यासह गतीने वाढत्या क्लाउड गेमिंग बाजारामध्ये नेतृत्व करणे सुरु ठेवत आहोत. मागील महिन्यात आम्ही एक्सबॉक्स क्लाऊड गेमिंगला पीसी बरोबरच अ‍ॅप्पल फोन आणि टॅबलेटवर 22 देशांमध्ये ब-ाउजरच्या माध्यमातून उपलब्ध केले आहे.

लाखो लोकांनी या आधीच आपल्या डेस्कटॉप, टॅबलेट आणि फोनवर गेम स्ट्रिम केले आहे आणि एक्सबॉक्स सीरीज एस आणि एक्स कंपनीचे आता पर्यंत सर्वांत गतीने विकले जाणारे कंसोल आहेत. यामध्ये कोणत्याही मागील पीढीच्या तुलनेत लाईव्ह टू डेट अधिक ंसोल विकले गेले आहेत.

नडेलाने म्हटले की शेवटी आम्ही क्रिएटर इकोनॉमीमध्ये आपल्या संधीना वाढविणे सुरु ठेवत आहोत यामुळे खेळाडूंसाठी फ्लाईट सिम्युलेटर आणि माइनक्रॉफ्टसह आमच्या अनेक सर्वांत लोकप्रिय खेळांमध्ये त्यांच्या रचनांचे निर्माण आणि मुद्रीकरण करण्यासाठी नवीन पध्दती जोडल्या आहेत. कंपनीने 46.2 अब्ज डॉलरचे चांगले महसूल मिळविले आहे जे 21 टक्क्याने वाढून 16.5 अब्ज डॉलरच्या शुध्द उत्पन्नासह जून तिमाहीमध्ये 47 टक्क्याने वाढले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!