फाइजर आणि मॉडर्नाने अमेरिकेतील अधिक लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधीत लशींची चाचणी करावी – अमेरिकी प्रशासन

वॉशिंग्टन

27जुलै

अमेरिकी सरकारची देशातील 12 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना लवकरच कोविड-19 ची लस देण्याची योजना आहे अशा स्थितीत अमेरिकी अन्न आणि औषधी प्रशासन (एफडीए) ने लस बनविणार्‍या फाइजर आणि मॉडर्नाना कोरोना प्रतिबंधीत लशींचे मुलांवरील आपल्या चाचणीच्या आकाराचा विस्तार करण्याची विनंती केली आहे.

मीडियामध्ये आलेल्या बातमींनुसार दोनीही कंपन्यांना सांगण्यात आले की त्यानी प्राधिकार मागण्याच्या आधी चाचणीमध्ये हजारो शालेय मुलाना सामिल करावे. हे पाऊल कोणत्याही संभावित सुरक्षा संकेतांची ओळख करण्यात मदत करेल.

वॉशिंग्टन पोस्टने सांगितले की चाचणीच्या आकारामध्ये वाढीमुळे हे आकलन करण्यास मदत  मिळेल की लशीकरणानंतर तत्काळ युवकांमध्ये ह्रदयातील मांसपेशिंमध्ये दुर्लभ सूज कमी वयोग्टातील समूहांच्या तुलनेत कमी असते किंवा अधिक येते आहे.

अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेननी मागील आठवडयात सीएनएन टाउन हॉलमधील बैठकीत म्हटले होते की 12 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील मुलांना लवकरच एक लस मिळू शकते आहे.

सध्या अमेरिकेत उपयोग करण्यात येत असलेल्या तीन कोविड -19 प्रतिबंधीत लशींपेकी एकही 12 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध नाही. फाइजर, मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसन अजूनही 12 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये लशींची सुरक्षा आणि प्रभावकारिताचे मूल्यांकन करण्यासाठी नैदानिक चाचण्या करत आहेत.

बातमीमध्ये सांगण्यात आले की 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी मॉडर्ना आणि फाइजर लशींचे परिणाम सप्टेंबरमध्ये येण्याची आशा होती तर या बदलांमुळे लशीच्या उपलब्धतेमध्ये उशिर होऊ शकतो आहे.

वॉशिंग्टन पोस्टने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर एका केंद्रिय अधिकार्‍याच्या हवाल्याने सांगितले की कंपन्यांना 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोविड लशीचा प्राधिकार ऑक्टोंबरच्या शेवटी किंवा नोंव्हेंबरच्या सुरुवातीला मिळू शकतो आहे.

चाचणीच्या आकाराला वाढविण्याच्या नियामक निर्णयाचा अर्थ हा आहे की अजून अनेक मुलांना भरती करणे आणि त्यांचे लशीकरण करणे आहे. अधिकार्‍याने सांगितले की सरकारला वाटते की अनेक माता-पिता आपल्या मुलांचे लशीकरण करण्यासाठी उत्सुक आहेत यामुळे अधिक मुलांचे नामांकन करण्यात कोणतीही समस्या असणार नाही.

अमेरिकी फार्मा फर्मचे प्रवक्ते रे जॉर्डन यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की मॉडर्नाने म्हटले की कंपनी आपल्या चाचण्याच्या विस्तार करण्यासाठी केंद्रिय नियमांका बरोबरील एका प्रस्तावावर सक्रियपणे चर्चा करत आहे परंतु अजून पर्यंत अंतिम संख्येवर करार झालेला नाही.

त्यांनी भविष्यवाणी केली की कंपन्याना लशीचा प्राधिकार 2021 च्या हिवाळ्यामध्ये किंवा 2022 च्या सुरुवातीला दिला जाऊ शकतो आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!