ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्ससाठी नवीन कोविड मदत पॅकेजची घोषणा

Australian officials report biggest daily covid-19 caseload

सिडनी प्रतिनिधी

13जुलै

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स सरकार (एनएसडब्ल्यू) ने मंगळवारी वर्तमान कोविड लॉकडाऊनच्या दरम्यान राज्यभरातील व्यवसाय आणि लोकांची मदत करण्याच्या उद्देशाने पाच बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षा अधिकची आर्थिक मदत पॅकेजची घोषणा केली.

न्यू साऊथ वेल्स सरकारने मंगळवारी घोषीत केलेल्या नवीन मदत पॅकेज अंतर्गत 5.1 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर पर्यंतची एक कटिबध्दता असेल ज्यात व्यापार आणि कर्मचारी मदत कार्यक्रमाच्या हिश्याच्या रुपात राष्ट्रकुलाकडून मिळालेले धन सामिल आहे.

दोन आठवडयापूर्वी घोषीत व्यापार अनुदान कार्यक्रमाचा विस्तार केला गेला असून पात्र व्यवसायासाठी 7,500 ते 15,000 ऑस्ट्रेलियन डॉलरच्या दरम्यान अनुदान उपलब्ध आहे.

केंद्रिय सरकार बरोबर मिळून एनएसडब्ल्यू सरकारद्वारा वितरीत करण्यात येणार्‍या एका नवीन व्यवसाय आणि कर्मचारी मदत कार्यक्रमा बरोबरच हजारो कर्मचार्‍यांची सुरक्षाही केली जाईल. आवासीय भाडेदारांना लक्षीत बेदखली अधिस्थगना बरोबरच अधिक सुरक्षा मिळेल आणि आवासीय घर मालक जे प्रभावित भाडेकरुंच्या भाडयामध्ये कमी करत आहेत ते आपल्या परिस्थितींच्या आधारावर अनुदान किंवा भूमि कर कपातीसाठी अर्ज करु शकतात.

एनएसडब्ल्यू प्रीमियर ग्लेडिस बेरेजिकेलियनने म्हटले की पॅकेजचे तीन प्रमुख उद्देश असून यात व्यापाराचे संरक्षण करणे, लॉकडाऊनच्या माध्यमातून नोकर्‍यांना वाचविणे आणि ठेवणे व अनिश्चित आणि कठिण काळाच्या दरम्यान लोकांना समर्थन सुनिश्चित करणे सामिल आहे.

बेरेजिकेलियन यांनी म्हटले की आमचे आरोग्य आणि वैद्यकिय कर्मचारी कोविड-19 च्या आघाडीवर लढत आहेत. जो पर्यंत लॉकडाऊन समाप्त होत नाहीत तोपर्यत या व्यापक मदत पॅकेजचा उद्देश नोकरीना वाचविणे आणि व्यवसायांचे संरक्षण करणे आहे

फंडचा उपयोग सूक्ष्म व्यवसाय, प्रदर्शन कला, आवास आणि मानसिक स्वास्थ्य सारख्या क्षेत्राचे समर्थन करण्यासाठी केला जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!