सॅमसंगला आपल्या स्मार्टफोनचे 61 मॉडेलला विकण्यास रुसमध्ये परवानगी नाही
मॉस्का,
रुसच्या न्यायालयाने निर्णय दिला की सॅमसंगला सॅमसंग पे चालविणारे आपल्या स्मार्टफोनचे 61 मॉडेलांना आयात आणि विक्रीला रोखले पाहिजे. कारण हे स्वित्झरलँडच्या मोबाईल भुगतान (देणी) कंपनी एसक्यूविन एसएच्या मालिक असलेल्या पेटेंटचे उल्लंघन करत आहे.
एसक्युविन एसएचा दावा आहे की सॅमसंग पे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक देणी सिस्टिीवर आधारीत आहे. फोनएरीनाच्या बातमीनुसार कंपनीने जवळपास आठ वर्षापूर्वी रुसमध्ये तंत्रतंज्ञानासाठी एक पेटेंटची नोंदणी केली होती.
बंदी घालण्यात आलेल्या सॅमसंगचे 61 मॉडेल असून यामध्ये सॅमसंगचे काही सर्वश्रेष्ठ 2021 फोन जसे की लेटेस्ट गॅलेक्सी जेड फ्लिप आणि फोल्ड फ्लेगशिप आणि 2017 चा गॅलेक्सी जे 5 सारखे काही बजट मॉडेलही सामिल आहेत.
जुलैमध्ये मॉस्को आर्बि-टेशन कोर्टने एसक्युविन यांच्या बाजूने निर्णय दिला. विशेष पेटेंट अधिकारांच्या संरक्षणासाठी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स रुसी कंपनीवर मुकदमा दाखल केला आणि भुगतान सेवा सॅमसंग पेच्या संचालनावर प्रतिबंध लावला.
सॅमसंग पेला रुसमधील तिसरी सर्वाधिक वापर करण्यात येणारी संपर्क रहित भुगतान प्रणालीच्या रुपात मानले जात आहे. यामध्ये सॅमसंग पे 17 टक्के देवाण घेवाणीसह अॅप्पल पे (30 टक्के) आणि गुगल पे (32 टक्क्े) च्या मागे आहे.
काउंटरपॉइंटनुसार सॅमसंगने 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये रुसी स्मार्टफोन बाजारामध्ये आपल्या अग-णी स्थितीला कायम ठेवले आहे.
गॅलेक्सी एस-21 सीरीज, गॅलेक्सी ए51 आणि गॅलेक्सी ए31 मॉडेलच्या मजबूत प्रदर्शनाच्या कारणामुळे त्यांनी आपल्या ऑनलाईन शेयरमध्येही सुधार केला आहे. चौथ्या तिमाही 2020च्या तुलनेत पहिली तिमाही 2021 मध्ये सॅमसंगच्या एकूण स्मार्टफोनची विक्रीमध्ये कमी आली आहे.