टी20 वॉर्ड काप भारत-पाक सामन्यापूर्वी विराटकडून मोठी अपडेट; रोहित शर्माशी असं कनेक्शन

दुबई

टी 20 विश्वचषकाची दुबईमध्ये सुरुवात झाली आहे. कोरोनाचं संकट असतानाही जवळपास 16 संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याच क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये 24 ऑॅक्टोबरला एक ब्लॉकबस्टर सामना पार पडणार आहे. हा सामना आहे, भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे.

आतापर्यंत भारतीय संघानं खेळल्या गेलेल्या पाचही टी20 सामन्यांत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे यंदा नेमकं काय चित्र पाहायला मिळणार याचीच उत्सुकता क्रीडारसिकांना लागून राहिलं आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं एक मोठा खुलासा केला आहे. के.एल. राहुल आणि रोहित शर्मा हे खेळाडू संघातून सलामीवीर म्हणून फलंदाजीची सुरुवात करुन देतील आणि आपण स्वत: तिसर्‍या स्थानावर फलंदाजीसाठी येणार असल्याचं त्यानं सांगितलं.

विराट संघाच्या वतीनं सलामीवीर म्हणून खेळपट्टीवर येतो का, असं वाटत असतानाच आता विराटनं अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सत्रात विराट बंगळुरू संघाच्या वतीनं सलामीवीर म्हणून मैदानात आला. दुसर्‍या सत्रातही तो याच स्थानावर दिसला. तर दुसरीकडे राहुलसाठी आयपीएल 2021 फायद्याचं ठरलं.

रोहित आणि राहुलवर संघाच्या फलंदाजीची सुरुवात करुन देण्याची धुरा सोपवण्यात आल्यामुळे आता ही जोडी संघाला मजबूत सुरुवात करुन देण्यात सातत्य ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरमाह आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटनं विश्वासानं दिलेली कामगिरी ही जोडी पार पाडत त्याच्या अपेक्षा पूर्ण करते का हे पाहणंही औत्सुक्याचं असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!