इस्त्रायली बंदीना फक्त पॅलिस्टिनी कैद्यांच्या मुक्ततेसाठी बदले जाईल – हमास

गाझा,

गाझापट्टीमध्ये इस्त्रायली बंदीना फक्त पॅलिस्टिनी कैद्यांच्या मुक्तेच्या बदल्यात बदले जाईल असे स्पष्ट मत गाझापट्टीवर शासन करणार्‍या इस्लामिक हमास व्हूमेंटने व्यक्त केले.

हमास हे 2007 पासून वीस लाखापेक्षा अधिकच्या पॅलिस्टिनीची वस्ती असलेल्या गाझापट्टीवर शासन करत आहे. त्यांनी म्हटले की इस्त्रायलने हे समजले पाहिजे की कैद्यांची अदला बदली ही एकमेव पध्दत आहे जे आपल्या बंदी सैनिकांना माघारी आणू शकतो.

2011 मध्ये इजिप्तने इस्त्रायल आणि हमासमध्ये एका कैद्याच्या अदला बदलीचा व्यवहार केला होता. यामध्ये इस्त्रायलने सैनिक गिलाद शालितच्या मुक्ततेच्या बदल्यात 1 हजारापेक्षा अधिक पॅलिस्टिनी कैद्याना मुक्त केले होते.

दहा वर्षापूर्वी इस्त्रायल आणि हमासमध्ये कैद्यांच्या अदला बादलीचा पहिला आणि एकमेव सौदा होता. हमासने सोमवारी म्हटले की पॅलिस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याचा मुद्दा हमाससह पॅलिस्टिनी गटांची प्राथमिकतांमध्ये सर्वांत वर आहे.

2017 मध्ये हमासच्या उग-वाद्यांनी म्हटले होते की त्यांच्या बाबत कोणतीही माहिती न देता त्यांनी गाझापट्टीमध्ये चार बंदीना पकडले होते

त्यांनी पुढे म्हटले की जो पर्यंत कैद्यांना मुक्त केले जात नाही तो पर्यंत आम्हांला विश्रांती मिळणार नाही.  आम्ही इस्त्रायली सरकारला पॅलिस्टिनी गटाना कबूल करण्यासाठी मजूबर केल्यानंतर एक नवीन स्वॅप करारावर पोहचण्याच्या जवळ आहोत. कारण इस्त्रायलकडे आमच्या मागण्यांना पूर्ण करण्या व्यतिरीक्त दुसरा कोणताही पर्याय नाही.

दोन आठवडयापूर्वी हमासच्या पॉलिट ब्यूरोचे प्रमुख इस्माइल हनीयेहच्या अध्यक्षतेखाली हमासच्या एका उच्च पदस्थ प्रतिनिधीमंडळाने गाझाच्या स्थिती आणि इस्त्रायल बरोबरील संभावित अदला बदलावर इजिप्तच्या वरिष्ठ सुरक्षा गुप्तचर अधिकार्‍या बरोबर अनेक चर्चा केल्या होत्या.

अधिकृत पॅलिस्टिनी आंकडेवारीनुसार इस्त्रायलयच्या 23 जेल आणि नजरबंदी शिबीरांमध्ये 4 हजारापेक्षा अधिक पॅलिस्टिनी कैदी आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!