आयआयटी दिल्लीला माजी विद्यार्थी एरोनकडून एक दशलक्ष अमेरिकन डॉलर भेट

नवी दिल्ली,

आयआयटी दिल्लीचा माजी विद्यार्थी डॉ.मोहित एरोनने आयआयटी दिल्लीला 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर भेट म्हणून दिले आहे. त्यांनी ही रक्कम आयआयटी दिल्लीतील कॉम्प्युटर विज्ञान आणि इंजीनियरिंग विभागाला दिली.

आयआयटी दिल्लीचा माजी विद्यार्थी एरोनने दिलेल्या या रक्कमेचा उपयोग शाखेतील संशोधन हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल.

आयआयटी दिल्लीनुसार या रक्कमेचा उपयोग करत विभागातील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थी भारत व विदेशात आयोजीत कार्यशाळा, प्रतिस्पर्धी कार्यक्रम आणि संमेलनामध्ये भाग घेऊ शकतील हे सुनिश्चित करण्यात येईल.

मोहित एरोनला हाइपर कन्वर्ज्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या जनकाच्या रुपात ओळखले जाते. ते स्केलेबल निर्माणातील 15 पेक्षा अधिक वर्षाचा अनुभवाचे उद्यमी आणि व्यवसायी आहेत. त्यांनी  2009 मध्ये न्यूटेनिक्स आणि 2013 मध्ये कोहेसिटी इंकची स्थापना केली आज या दोनीही कंपन्या यूनिकॉर्न बनल्या आहेत.

2018 मध्ये डॉ.एरोनला राइस विद्यापिठाचा उत्कृष्ट इंजीनियरिंगचा माजी विद्यार्थी पुरकार मिळाला आहे. या विद्यापीठातून त्यांनी 2000 मध्ये आपली पीएचडी पूर्ण केली होती. त्यांना 2019 मध्ये आयआयटी दिल्लीचा विशिष्ट माजी विद्यार्थी पुरस्कारही मिळाला.

आपल्या योगदानाच्या मागील कारणां बाबत बोलताना डॉ.मोहित एरोननी म्हटले की माझे शिक्षण आयआयटी दिल्लीमध्ये झाले. कॉम्प्युटर विज्ञान विभाग माझ्या करीअरचा एक आधारभूत स्तंभ राहिला आहे. आज मी जे काही आहे ते याच कारणामुळे आहे. ही भेट अशा विभागाला माघारी काही देण्याची माझी पध्दत आहे ज्याने मला इतके काही दिले आहे.

भेटीचे स्वागत करत आयआयटी दिल्ली कॉम्प्युटर विज्ञान आणि इंजीनियरिंग प्रमुख प्राध्यापक प्रेम कालरानी म्हटले की सीएसई विभागाने मागील 2 वर्षात अनेक नवीन सदस्यांना शाखेत जोडले आहे. मोहितांची ही उदार भेट आम्हांला 2025 पर्यंत जगभरातील शीर्ष 50 सीएस विभागामध्ये आणि 2030 पर्यंत शीर्ष 30 मध्ये आपल्य लक्ष्याकडे नेईल.

प्रा.व्ही.रामगोपाल राव, निदेशक आयआयटी दिल्ली यांनी मोहित एरोनला त्यांच्या उदार भेटसाठी धन्यवाद दिले आणि म्हटले की माजी विद्यार्थ्यांचे योगदान, जसे की मोहितचे एक महत्पूर्ण संसाधन आहे. आयआयटी दिल्लीमध्ये नुकतेच सुरु करण्यात आलेले स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस बाबत सीएस, एआय, डेटा साइंस आणि संबंध्द क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण करणार्‍या विद्यार्थ्यामध्ये खूप एक्साइटमेंट आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!