रुसी चित्रपट क्रूने अवकाशातील चित्रीकरण पूर्ण केले व पृथ्वीवर परतले

मॉस्को,

एक रुसी अवकाशवीर, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माता हे एका चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी जवळपास पंधरवाडा अवकाशात राहिल्यानंतर सुखरुपपणे पृथ्वीवर परतले आहेत.

रुसी अवकाश संस्थेनुसार अभिनेत्री यूलिया पॅरसिल्ड आणि निर्माता क्लिम शिपेंको रविवारी रुसी केंद्रिय अवकाश संस्था रॉस्कोस्मोसच्या अवकाश प्रवासी ओलेग नोवित्स्की बरोबर पृथ्वीवर उतरले. हे तिघेही सोयुझ एमएस-18 अवकाश यानामधून 12.35 वाजता ईडीटीवर कझाकिस्तानमध्ये उतरले.

अवकाशामध्ये उड्डाण करणारे पहिले व्यवसायीक चित्रपटाच्या टिमने आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर एका चित्रपटाचे  12 दिवस चित्रीकरण केले. चित्रपट एका महिला डॉक्टरा बाबत असून जी एका अवकाश प्रवासीचे जीव वाचविण्यासाठी कक्षीय चौकीचा प्रवास करते.

चित्रपट रॉस्कोमोस, रुसचे चॅनल वन आणि येलो, ब्लँक अँड व्हाईट स्टूडिओची एक संयुक्त योजना आहे. बातमीमध्ये सांगण्यात आले की रुसी अवकाश प्रवासी अ‍ॅटोन श्काप्लेरोव, नोवितकी आणि प्योत्र डबरोवही चित्रपटामध्ये सामिल आहेत. चित्रपटाचे स्क्रीन टाईम जवळपास 35 ते 40 मिनिटांचा ऑर्बिटमध्ये चित्रीकरण केले जाणार होते.

नोवित्सकी, पेरेसिल्ड आणि शिंपेकोनी शनिवारी बहुउद्देशीय प्रयोगशाळा मॉडयूलमधून सोयुझ एमएस-18 ला अनडॉक करण्या बरोबरच आपल्या घराचा प्रवास सुरु केला

स्पेस डॉट कॉमच्या बातमीनुसार अवकाश यानाने पृथ्वपीच्या वायूमंडळात प्रवेश करणे आणि पॅराशूटच्या सहाय्याने पृथ्वीवर उतरण्याच्या आधी एक डी-ऑर्बिट बर्न केले आणि आपल्या कक्ष व प्रणोदन मॉडयूलला शेड केले.

रॉस्कोस्मॉसने पहिल्यांदा नोव्हेंबर 2020 मध्ये चित्रपट योजनेची घोषणा केली आणि 37 वर्षीय पेरसिल्डला या भूमिकेसाठी निवडण्यात आले.

या आधी सोविएट संघाच्या काळात अवकाश प्रवासीना सोयुझ टि-9 वर आणि रुसी 1984 ची  कथा चित्रपट रिटर्न फ्रॉम ऑर्बिटसाठी सॅल्यूट -7 अवकाश केंद्रामध्ये चित्रीकरण करण्यात आले होते.

बातमीमध्ये सांगण्यात आले की चोवीस वर्षानंतर खाजगीपणे वित्त पोषीत अवकाश प्रवासी रिचर्ड गॅरियटने आयएसएसवर स्थापित एक लघु विज्ञान कथा चित्रपट अपोजी ऑफ फियरचे चित्रीकरण केले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!