चीन आणि अमेरिकेत युद्ध होणार, ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

वॉशिंग्टन,

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एक मोठं वक्तव् केलंय. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेचे चीनशी ‘युद्ध‘ होऊ शकते. असे त्यांनी बायडेन सरकार किती कमकुवत आहे. त्यांच्यामुळे युद्ध होऊ शकते. अशी टीका करत हे वक्तव्य केलंय. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेत ‘कमकुवत आणि भ-ष्ट‘ सरकार असल्यामुळे बीजिंग आता वॉशिंग्टनचा आदर करत नाही.

ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका आणि चीनचे अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये भेटणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी बायडेन यांच्यावर टीका करत म्हटले की, ’निवडणुकांमध्ये गडबड झाली आणि अमेरिकेकडे आता कमकुवत आणि भ-ष्ट नेतृत्व आहे आणि आम्हाला चीनशी युद्धाला सामोरे जावे लागेल जे आता अमेरिकेचा आदर करत नाहीत.‘

गेल्या दोन वर्षांपासून दोन महासत्तांमध्ये तणाव सुरू आहे. कोरोना महामारीमुळे यात आणखी भर पडली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला होता की चीनने कोरोनाचा संसर्ग मुद्दाम पसरवला आणि त्याची योग्य माहिती जगापासून लपवली. आपल्या संपूर्ण कार्यकाळात ट्रम्प चीनवर अत्यंत आक्रमक होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!