‘या’ दोन संशोधकांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
स्टॉकहोम,
वैद्यक आणि भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आज रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जर्मन बेंजामिन लिस्ट आणि स्कॉटिश वंशाचे डेव्हिड मॅकमिलन यांना जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीचा हा पुरस्कार अॅसिमेट्रिक ऑॅर्गेनकॅटालिससच्या संशोधनासाठी देण्यात आला आहे. या दोन संशोधकांनी मॉलिक्युलर कंस्ट्रक्शनकरीता एक नवीन उपकरण विकसित केले आहे. त्याचा फायदा फार्मास्युटिकल संशोधनात होणार आहे.
रासायनिक अभिक्रियांचे अनेक संचलन करण्यासाठी सेंद्रिय उत्प्रेरकांचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच संशोधक आता या प्रतिक्रियांचा वापर करून नवीन फार्मास्युटिकल्सपासून ते रेणूंपर्यंत काहीही अधिक प्रभावीपणे तयार करू शकतात. जे सौर पेशींमध्ये प्रकाश घेऊ शकतात, असे रॉयल स्वीडीश अॅकडमी ऑॅफ सायन्सने हा पुरस्कार देताना म्हटले आहे.
उत्प्रेरक हे असे रेणू असतात. जे प्रयोगशाळेत किंवा मोठ्या औद्योगिक अणुभट्ट्यांमध्ये केलेल्या रासायनिक अभिक्रियांना सक्षण किंवा गती देताना स्थिर राहतात. या संशोधकांच्या निष्कर्षापुर्वी फक्त काही धातू आणि जटिल एंजाईम युक्ती करण्यासाठी ओळखल्या जात होत्या. उत्प्रेरकांची नवीन पिढी पर्यावरणासाठी अधिक अनुकुल आणि उत्पादन करण्यासाठी स्वस्त आहे. औषध, प्लास्टिक, परफ्यूम आणि फ्लेवर्स सारखे नवीन पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर होणार आहे.