महिला क्रिकेट : विंडीजचा सुपर ओव्हरमध्ये दक्षिण अफ्रिकेवर विजय
अँटिगर,
वेस्टइंडिजच्या महिला क्रिकेट संघाने येथील सर व्हिव्हियन रिचर्डस मैदानावर खेळण्यात आलेल्या पाचव्या आणि शेवटच्या एकदिवशीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या संंघाला पराभूत केले. या सामन्यातील पराभवानंतरही मात्र दक्षिण अफ्रिकेने मालिका 4-1 ने जिंकली.
सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राशदा विलियम्सच्या 138 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 78 धावांच्या जोरावर 50 षटकांमध्ये पाच गडी गमवून 192 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेने लिजेले लीच्या 78 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 61 धावांच्या जोरावर 50 षटकांमध्ये सात बाद 192 धावा केल्या.
दोनीही संघातील धावसंख्या बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून केला गेला. येथे दक्षिण अफ्रिकेचा संघ एक षटकात सहा धावा करु शकला तर विंडीजने सहजपणे लक्ष्याला गाठत पाच एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय मिळविला.
सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून लीच्या व्यतिरीक्त ताजमिन बि-टजने 48 आणि मिगनोन डू प्रीजने 46 धावा केल्या तर सिनालो जाफता 16 धावा करुन नाबाद राहिली.
या आधी विंडीजकडून राशदाच्या व्यतिरीक्त हेली मॅथ्यूजने 48, रेनिएरो बोयसने 14 आणि चेडिएन नेशनने 11 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेकडून नादिने डी कलेंकने तीन. कर्णधार वान निएकेंक आणि क्लोए ट्रियोनने प्रत्येकी एक गडी बाद केला.