रोहित शर्मा पुढील सामन्यात सामिल होईल – जयवर्धने

दुबई,

मुंबई इंडियंसचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेला विश्वास आहे की संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलच्या पुढील सामन्यात सामिल होईल. रोहित शर्मा रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुध्द खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई संघात सामिल नव्हता. मुंबईचा पुढील सामना 23 सप्टेंबरला कोलकाता नाईट राइडर्स विरुध्द होणार आहे

आयपीएलच्या दुसर्‍या फेरीत रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियंसचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने सामन्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की रोहित चांगली फलंदाजी करत आहे परंतु इंग्लंडवरुन माघारी परतल्याच्या कारणामुळे आम्हांला वाटते की त्याला अजून काही दिवसांची गरज आहे तो पुढील सामन्यात खेळण्यासाठी ठिक आहे.

अष्टपैलू हार्दिक पांडयाचे पुढील सामन्यात खेळणे अनिश्चित आहे कारण त्याला काही अडचणी आहेत. यावर जयवर्धनेने म्हटले की हार्दिक ट्रेनिंग करत आहे परंतु त्याला काही अडचणी आहेत. खबरदारीच्या उपाय म्हणून आम्ही त्याला अजून काही दिवस विश्रांती देण्या बाबत विचार करत आहोत. गोष्टी कशा आहेत हे पाहूत परंतु हे गंभीर नाही.

जयवर्धनेने याच बरोबर म्हटले की, चेन्नई सुपर किंग्समधील ॠतुराज गायकवाड सारखी फलंदाजी मात्र मुंबई संघातील कोणत्याही फलंदाजाने केलेली नाही. दुसर्‍या डावात खेळपट्टी चांगली होती आणि आमच्या फलंदाजाना वाटले की ते फलंदाजी करु शकतात. आम्ही काही गडी सहजपणे गमविले याला मी स्विकारतो आहे.

त्याने म्हटले की गायकवाडने जसे चेन्नईसाठी केले तसेच आम्हांला अशा फलंदाजाची जरुरी होती जो जबाबदारीने खेळेल आणि डावाला शेवट पर्यंत नेईल परंतु आम्ही असे करु शकलो नाहीत. ज्यावेळी चेन्नईचे गडी बाद होत होते तर एक स्थिरावलेला फलंदाज शेवट पर्यंत टिकून राहिला. माझ्या मते आम्ही ज्या प्रकारे स्थितीला पाहिले आहे त्यावरुन आम्ही निराश आहोत

त्याने म्हटले की ब-ेक आमच्या नियंत्रणात नाही आणि आम्ही भारतामध्ये ज्या प्रकारे सामने खेळले परंतु दुर्भाग्यपणे स्पर्धेला मध्येच थांबवावे लागले आणि सर्व लोकांना जगभरातील वेगवेगळ्या भागात खेळावे लागले यानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलोत आणि लय बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.

जयवर्धनेने म्हटले की चेन्नईच्या विरुध्द आम्हांला चांगले करावे लागेल याची आम्हांला माहिती होती आणि आम्ही या बाबत चर्चाही केली होती. आम्ही काही चूका केल्या आहेत आणि ह्या आशा आहेत ज्यावर आम्हांला लवकर काम करावे लागेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!