अमेरिकेतील प्राणीसंग-हालयात सिंह, वाघांमध्येही कोरोनाचे लक्षण आढळले
वॉशिंग्ट
कोरोनाने फक्त मानवालाच घेरले आहे असे नाही तर प्राणीही यातून वाचू शकले नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीमधील स्मिथसोनियन राष्ट्रीय प्राणीसंग-ाहलयातील सर्व सिंह आणि वाघांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यात या विषाणूचे लक्षण आढळून आले आहे. परंतु या संबंधीचा अंतिम रिपोर्ट अजून प्राप्त झालेला नाही अशी घोषणा एका निवेदनात केली गेली.
शुक्रवारी प्रसिध्द निवेदनात म्हटले गेले की अमेरिकेतील सर्वात जुने प्राणीसंग-हालयामध्ये सहा अफ्रिकन सिंह, एक सुमात्रा वाघ आणि दोन अमूर वाघांसह सर्व मोठया मांजरींच्या शौच्याचे नमुने गोळा केले आणि त्यांची चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचा अंतिम रिपोर्ट पुढील काही दिवसांमध्ये मिळण्याची आशा आहे.
निवेदनात म्हटले की प्राणीसंग-हालयामध्ये कोणत्याही अन्य जनावारामध्ये संक्रमणाचे कोणतेही लक्षण दिसून आले नाहीत. प्राणीसंग-हालयानुसार पशूपालकांनी मागील आठवडयात अनेक सिंह आणि वाघांमध्ये भूकेची कमी, खोखला, शिंका आणि सुस्ती पाहिली आहे.
पुढे सांगितले की या सर्व सिंह आणि वाघांवरील उपचार बेचैनी आणि भूकेच्या कमीच्या कारणासाठी अँटी इंफ्लेमेटरी आणि मलरोधी औषधा बरोबरच प्रकल्पि माध्यमिक जीवाणु निमोनियासाठी अॅटीबायोटिक औषधांसह केला जात आहे.हे सर्व श्वापदे कडक देखरेखीखाली आहेत.
निवेदनात म्हटले की आता पर्यंत संक्रमण स्त्रोताला इंगित करण्यासाठी कोणताही पुरावा मिळाला नाही. प्राणीसंग-हालयाने जे कर्मचारी या सिंह आणि वाघांच्या जवळ होते आशा सर्वांची सखोल तपासणी केली आहे.
अमेरिकी कृषि विभागाने जोएटिव्हद्वारा विशेषपणे प्राणीसंग-हातील जनावारांसाठी बनविलेल्या सार्स सीओवी -2लसच्या उपयोगाला अधिकृत केले आहे.
प्राणीसंग-हालयाने म्हटले की लशीकरणाच्या पहिल्या फेरीत अंतिसंवेदनशिल प्राजतीच्या रुपात ओळखल्या जाणार्या जनावाराना प्राणीसंग-हालय आणि वजीर्नियामधील संरक्षण जीवविज्ञान संस्थान दोनीहीमध्ये उपलब्ध केले जाईल आणि हे आगामी महिन्यात उपलब्ध होतील.