पाकिस्तानमध्ये कोविडची चौथी लाट कमजोर

इस्लामाबाद,

नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटर (एनसीओसी) च्या आंकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये मागील दोन दिवसामध्ये दैनिक कोविड -19 संख्येमध्ये घसरण नोंदवली गेली. बुधवारी सकाळी कोरोनाचे 2,714 नवीन रुग्ण समोर आले.

एनसीओसीच्या ताज्या आंकडेवारीनुसार कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट घसरुन 4.78 टक्क्यावर आला आहे. मागील वेळी 24 जुलैला देशात कोरोना पॉझिटिव्ही रेट 5 टक्क्यापेक्षा कमी होता.

मागील 24 तासामध्ये 56,733 कोरोना विषाणूच्या चाचण्या केल्यानंतर 2,714 नवीन रुग्ण समोर आले. याच बरोबर कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 21 लाख 2 हजार 809 झाली आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीनंतर पाहिल्यादाच सक्रिय रुग्णांची संख्या 80 हजारापेक्षा कमी होण्या बरोबरच दैनिक संख्येमध्ये थोडी घसरण आली आहे. जियो टिव्हीने सांगितले की वर्तमानात सक्रिय रुग्णांची संख्या 77,532 आहे. मागील 24 तासामध्ये कोविड 19 मुळे अजून 73 लोकांचा मृत्यू झाला आहे याच बरोबर मृतकांची संख्या 26,938 झाली आहे.

मागील 24 तासामध्ये ठिक होणारे 10,923 लोका बरोबरच एकूण ठिक होणार्‍यांची संख्या 1 कोटी 10 लाख 8 हजार 339 झाली आहे. पाकिस्तानमध्ये कोविड -19 संक्रमण कमी होत आहे आणि प्रत्येक दिवशी सरासरी 3,406 नवीन संक्रमीत रुग्ण समोर आले आहेत.

पाकिस्तानने आता पर्यंत कोविड प्रतिबंधीत 6 कोटी 82 लाख 27 हजार 337 लसचे डोज दिले आहेत. एका व्यक्तीला दोन डोजची आवश्यकता आहे असे मानल्यास या लशींचे डोज देशाच्या एकूण 15.8 टक्के लोकांचे लशीकरण्यासाठी पर्याप्त आहेत.

अहवालामध्ये सांगीतले की आठवडयाच्या शेवटी पाकिस्तानमध्ये प्रतिदीन सरासरी जवळपास 10 लाख 40 हजार 926 कोरोना प्रतिबंधीत लसचे डोस दिले गेले. अन्य दहा टक्के लोकसंख्येसाठी पर्याप्त लस देण्यासाठी 42 दिवस अजून लागतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!