बदली म्हणून येणार्‍या खेळडूंकडेही चांगली प्रतिभा आहे – कोहली

दुबई

संघात बदली (रिप्लेसमेंट) म्हणून सामिल होणारे खेळांडूही चांगल्या प्रतिभेसह येत आहेत असे मत आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) चा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

अ‍ॅडम जम्पा, डेनियल सेम्स, फिन अ‍ॅलेन, केन रिचर्डसन आणि वॉशिंग्टन सुंदर हे वेगवेगळ्या कारणामुळे आयपीएल 2021 च्या दुसर्‍या फेरीत सहभागी होऊ शकत नाही यामुळे आरसीबीने त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून वनिंदु हसरांगा, दुसमंथा चमीरा, टिम डेव्हिड, जॉर्ज गारटोन आणि आकाश दीपला संघात सामिल केले आहे.

कोहलीने फ्रेंचाईजीद्वारा पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की मागील महिन्यात या सर्वां बरोबर माझे बोलणे झाले आहे आम्ही आपल्या काही महत्वपूर्ण खेळांडूच्या जागी उच्च दर्जांच्या खेळाडूंना रिप्लेस केले आहे. आमचे काही महत्वाचे खेळाडू जरुर आमच्या बरोबर नसतील परंतु जे खेळाडू संघात सामिल होत आहेत त्यांच्याकडेही कमालीची प्रतिभा आहे. मी त्यांच्या बरोबर सराव करण्यासाठी खूप उत्साहित आहे.

इंग्लंडहून निर्धारीत वेळेच्या आधी यूएईला पोहचण्यावर कोहलीने म्हटले की दुर्भाग्यपूर्ण राहिले की कोविंडमुळे आम्हांला येथे लवकर पोहचावे लागले. जो पर्यंत कोविड आहे तो पर्यंत काहीही होऊ शकते आहे. आशा करतो की आम्ही येथे सुरक्षीत राहूत आणि आयपीएलचा आनंद घेऊ शकूत यानंतर परत एकदा टि-20 विश्व कप खेळूत.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयपीएलची दुसरी फेरी खेळण्यासाठी दुबईला पोहचला आणि त्याने सांगितले की तो संघा बरोबर जोडून खूप आनंदी आहे. संघा बरोबर असणे खूप चांगले वाटत आहे आणि गुण तालिकेत आम्ही चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आमच्याकडे खूप चांगले खेळडू आहेत. सत्य सांगायचे तर माझे करीअरही येथूनच पुढे वाढले आहे यामुळे मी माघारी येऊन खूप उत्साहित आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत जेथे मी प्रमुख गडी बाद करणारा गोलंदाज होतो मी या प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे.

रविवारी दुबईला पोहचल्यानंतर कोहली आणि सिराज आता सहा दिवस हॉटेलमध्ये क्वारंटीनमध्ये राहतील. आरसीबी सात सामन्यात दहा गुणांसह गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. ते 20 सप्टेंबरला अबू धाबीमध्ये कोलकाता नाईट राइडर्स विरुध्द आयपीएल 2021 च्या दुसर्‍या फेरीची सुरुवात करतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!