पराभवाला सहणे कठीण, परंतु टेनिसमध्ये आम्ही लवकर शिकतो: जोकोविच

न्यूयॉर्क

यूएस ओपनच्या फायनलमध्ये रशियाचा डेनिल मेदवेदेवद्वारे मिळालेल्या पराभवभानंतर विश्वाचा नंबर-1 टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचने सांगितले की या पराभवाला सहन करणे कठीण आहे परंतु टेनिसमध्ये लोक लवकरच शिकतात. जोकोविचने यावर्षी तीन ग्रँड स्लॅम जिंकले होते आणि जर तो यूएस ओपनला जिंकण्यात यशस्वी राहिला तर तो 1969 मध्ये रोड लावेरनंतर एकाच सीजनमध्ये चार ग्रँड स्लॅम प्राप्त करणारा पहिला व्यक्ती बनतो.

भावुक जोकोविचने एटीपीटूर डॉट कॉमला सांगितले, या पराभवाला सहन करणे कठीण आहे. परंतु दुसरीकडे मी येथे न्यूयॉर्कमध्ये असे जाणवले जे कधी आयुष्यात जाणवले नाही. दर्शकांनी मला विशेष जाणवले. हे माझ्यासाठी आश्चर्यजनक होते.

2015 मध्ये विम्बलडन जिंकल्यानंतर जोकोविचने आपले मागील 14 पैकी 12 ग्रँड स्लॅम फायनल सामन्याला जिंकले. त्याला मगीलवर्षी फ्रेंच ओपनमध्ये राफेल नडाल आणि 2016 मध्ये फ्लशिंग मिएडोव्समध्ये स्वित्झर्लंडच्या स्टान वावरिंकाने पराभवाचा सामना करावा लागला होता.

जोकोविचने सांगितले दर्शकांकडून मला जे समर्थन आणि ऊर्जा आणि प्रेम मिळाले, ते काही असे होते ज्याला मी नेहमी लक्षात ठेवेल. हे 21 ग्रॅँड स्लॅम जिंकणे जितके मजबुत आहे. मला असेच वाटले, प्रमाणिकपणाने म्हणावे तर मला खुप खुप विशेष वाटले.

त्यांनी सांगितले मेदवेदेवच्या मानसिकतेला पूर्ण श्रेय जाते. तो निश्चित रूपाने चांगला खेळाडू आहे आणि विजयाचा हक्कदार होता, यात कोणतीही शंका नाही.

जोकोविचने सांगितले मी आज पूर्ण खेळाने निराश आहे यात शंका नाही. मलाम माहित आहे की मी चांगले करू शकत होतो आणि करायला पाहिजे होते. परंतु हा खेळ आहे. काही मिळव ण्यासाठी काही गमवावे लागते. हा एक कठीण पराभव आहे, खुप कठीण पराभव आहे. परंतु तसेच मी त्याच्यासाठी खुश आहे  कारण तो एक चांगला मुलगा आहे आणि तो याचा हक्कदार होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!