महिलेच्या अंतर्वस्त्रामध्ये लपून पालीने केला तब्बल चार हजार मैलांचा प्रवास, इंग्लंडमधील विचित्र घटना
लंडन,
एका लहानशा पालीने तब्बल चार हजार मैलांचा प्रवास केल्याचं कुणाला सांगितलं तर ते पटणारं आहे का? पण अशी विचित्र घटना घडलीय. इंग्लंडमधील एका महिलेच्या ब-ा मधून लपून एका लहानशा पालीने बार्बादोस ते यॉर्कशायर असा तब्बल चार हजार मैलांचा प्रवास केला आहे. लिसा रसेल (47 वर्षे) असं या महिलेचं नाव असून तिला रॉथरहॅम मधील घरी आल्यानंतर आपल्या बॅगेत ठेवलेल्या ब-ा मधून पाल आल्याची माहिती झाली. लिसा रसेलने या लहान पालीचे नाव ’बार्बी’ असं ठेवलं आहे.
लिसा रसेल जेव्हा सुट्ट्या संपवून आपल्या घरी आली तेव्हा तिने आपली बॅग उघडली. या बॅगमध्ये तिचे सर्व कपडे होते. ते पाहताना तिला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या बॅगेत ठेवलेल्या ब-ा मध्ये एक लहानशी पाल होती. बीबीसी या वृत्त समूहाशी बोलताना रसेलने सांगितलं की, ‘माझ्या कपड्यांमध्ये पाल सापडल्याने मला एकदम धक्काच बसला. त्या पालीने हालचाल केली असती मी घाबरले आणि ओरडायला सुरुवात केली. तुम्ही जवळेपास चार हजार किलोमीटरचा प्रवास करुन आल्यानंतर तुमच्या कपड्यांमध्ये पाल असणं तुम्हाला कसं काय अपेक्षित असू शकेल?‘
रसेलने सांगितलं की, ज्या ब-ामध्ये ती पाल लपली होती तो ब-ा मी बॅगच्या सर्वात वरती ठेवला होता. त्यामुळे ती पाल वाचली. ते जर कपड्यांच्या मध्ये असते तर ती पाल नक्कीच गुदमरून मेली असती.
रसेलने या लहान पालीचा फोटोदेखील काढलाय. कारच्या चावीच्या बाजूला ठेवून काढलेल्या या फोटोवरून ती पाल जास्तीत जास्त एक सेंटीमीटर लांबीची असेल असं दिसतंय.