अफगाणिस्तान सरकारमधील गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, अमेरिकेकडून 50 लाखांचं बक्षीस

काबूल

संपूर्ण अफगाणिस्तान पर कब्जा मिळवल्यानंतर 22 दिवसानंतर तालिबाननं मंगळवारी आपल्या नव्या सरकारची घोषणा केली. तालिबाननं अमेरिकेतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीला अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. सिराजुद्दीन हक्कानीचे नावही जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याच्याबद्दल माहिती देणार्‍याला अमेरिकेनं 50 लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.

तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत नवीन सरकारविषयी माहिती दिली. तालिबानी सरकारमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांना पंतप्रधान करण्यात आले आहे. तालिबानचा नंबर दोन नेते म्हणून मुल्ला गनी बरादर उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील. बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क चालवणारा सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तानमधील मीराम शाह भागातला असल्याचं बोललं जातं. हक्कानी नेटवर्कच्या या टॉप दहशतवाद्याचे नाव अजूनही एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.

हक्कानी नेटवर्कच्या ऑॅपरेशनचं नेतृत्व जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी करत आहे. असे म्हटले जाते की क्रूरतेच्या बाबतीत तो आपल्या वडिलांच्या पुढे आहे. सिराजुद्दीन 2008 ते 2020 पर्यंत अफगाणिस्तानात अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. 15 हजार दहशतवादी हक्कानी नेटवर्कशी संबंधित असल्याचंही सांगितलं जातं.

अमेरिका सिराजुद्दीन हक्कानीला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. 2008 मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येचा कट रचण्यात या दहशतवाद्याचे नावही समोर आले. सिराजुद्दीनवर जानेवारी 2008 मध्ये काबूलमधील एका हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अमेरिकन लोकांसह सहा जण ठार झाले.

तालिबानचं नवं मंत्रिमंडळ

पंतप्रधान- मुल्ला मोहम्मद हसन अखुंद

उपपंतप्रधान (1)- मुल्ला गनी बरादार

उपपंतप्रधान (2)- मुल्ला अब्दास सलाम

गृहमंत्री- सिराजुद्दीन हक्कानी

संरक्षण मंत्री- मुल्ला याकूब

माहिती मंत्री- खैरुल्लाह खैरख्वा

माहिती मंत्रालयातील उपमंत्री- जबिउल्लाह मुजाहिद

उप परराष्ट्र मंत्री- शेर अब्बास स्टानिकजई

न्याय मंत्रालय- अब्दुल हकीम

अर्थमंत्री- हेदयातुल्लाह बद्री

मिनिस्टर ऑॅफ इकोनॉमी- कारी दीन हनीफ

शिक्षण मंत्री- शेख नूरुल्लाह

हज आणि धार्मिकसंबंधी मंत्री – नूर मोहम्मद साकीब

आदिवासी व्यवहार मंत्री- नूरुल्लाह नूरी

ग-ामीण पुनर्वसन आणि विकास मंत्री- मोहम्मद युनूस अखुंदजादा

सार्वजनिक बांधकाम मंत्री- अब्दुल मनन ओमारी

पेट्रोलियम मंत्री- मोहम्मद एस्सा अखुंद

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!