इस्त्रायलची लोकसंख्या 93.9 लाखापेक्षा जास्त
तेल अवीव,
इस्त्रायलची लोकसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत 92.4 लाखावरुन वाढून 93.9 लाख झाली आहे. जी 1.57 टक्के अधिक आहे. देशाच्या केंद्रिय सांख्यीकी ब्यूरोने यहूदी नव वर्षाच्या सोमवार संध्याकाळा पासून ते बुधवारी संध्याकाळ पर्यंत प्रसिध्द एका वार्षीक अहवालामध्ये याची माहिती दिली.
अहवालामध्ये सांगण्यात आले की देशाची लोकसंख्या 2024 च्या शेवट पर्यंत 1 कोटी, 2048 पर्यंत जवळपास 1.5 कोटी आणि 2066 च्या शेवट पर्यंत दोन कोटी पर्यंत पोहचण्याची आशा आहे.
यहूदींची लोकसंख्या 69.43 लाखासह इस्त्रालयच्या एकूण लोकसंख्येचे 74 टक्के आहे. यानंतर 19.82 लाख अरब आहेत जे 21 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत आहेत. बाकी 4 लाख 66000 आहेत जे गैर अरब ख्रिश्चन आहेत, अन्य धार्मिक आणि गैर धार्मिक नागरीक आहेत असे इस्त्रायलच्या एकूण लोकसंख्येचे 5 टक्के आहेत.
या व्यतिरीक्त इस्त्रायलमध्ये जीवीत राहण्याचे वयोमान हे महिलांचे 84.8 वर्ष आहे तर पुरुषांचे 80.7 वर्ष आहे. शिशु मृत्यूदर 1 हजार जन्मांमध्ये 2.3 आहे.
अहवालातून माहिती पडते की इस्त्रायलमध्ये 20 आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील जवळपास 45 टक्के यहूदी स्वत:ला धर्मनिरपेक्ष, 33 टक्के पारंपारीक, 12 टक्के धार्मिक आणि 10 टक्के अति-रुढीवादीच्या रुपात परिभाषीत करत आहेत. 90 टक्के इस्त्रायली आपल्या जीवनात संतुष्ट आहेत तर 65.8 टक्के आपल्या आर्थिक स्थितीने संंतुष्ट आहेत.