भाग्यश्री जाधवला सातव्या स्थानावर समाधान

टोकियो,

भारतीय महिला गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव, टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये 7व्या स्थानावर राहिली. एफ34 च्या अंतिम इव्हेंटमध्ये तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

भाग्यश्री जाधवने 5.87 मीटरचा थ-ो करत चांगली सुरूवात केली होती. परंतु तिला सहा प्रयत्नात 7 मीटर लांब गोळा फेकता आला. या गटात चीनच्या जू लिजूआन हिने 9.19 मीटर लांब गोळा फेकत विश्व विक्रम नोंदवला. तर पोलंडची लुसीना कोर्नोबिस आणि सैदा अमौदी या अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहिल्या.

दरम्यान, टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारताने सोमवारी एकूण 5 पदके जिंकली. यासह भारताचे या स्पर्धेतील पदक संख्या 8 इतकी झाली आहे. भारतासाठी हे पॅराऑॅलिम्पिक सर्वात यशस्वी ठरले आहे. याआधी भारताने 2016 रिओ पॅराऑॅलिम्पिक आणि 1984 पॅराऑॅलिम्पिकमध्ये प्रत्येकी 4-4 पदके जिंकली होती.

महिला डबल्समध्ये भाविनाबेन आणि सोनलबेन जोडीचा पराभव

टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये टेबल टेनिस क्लास 4 आणि 5 गटात भारताचे खराब प्रदर्शन राहिले. भाविनाबेन पटेल आणि सोनलबेन पटेल या भारतीय जोडीचा चीनच्या झोउ यिंग आणि झांग बियान जोडीने सरळ सेटमध्ये पराभव केला. चीनच्या जोडीने भारतीय जोडीचा 11-2, 11-4, 11-2 असा पराभव केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!