ऑनलाईन गेमिंगच्या सवयींना समाप्त करण्याचा चीनचा मोठा निणर्य
बिजिंग,
चीनी सरकारने आपल्या देशातील युवकांच्या ऑनलाईन गेमिंगच्या सवयीला गंभीरतेने घेतले असून सरकारने घरीच युवकांना वेळ घालविण्याच्या पध्दतीमध्ये आपल्या भागेदारीला वाढविण्या बरोबरच देशात कमी वयाच्या गेमर्सला आता एक दिवसभरात फक्त एक तास याप्रमाणे आठवडयाभर ऑनलाईन गेम खेळण्याची परवानगी दिली आहे अशी घोषणा अधिकार्याने केली.
नॅशनल प्रेस अँड पब्लिकेशन अॅडमिनिस्ट्रेशन (एनपीपीए) नुसार चीनमध्ये आता 18 वर्षापेक्षा कमी वयाचे व्हिडीओ गेम खेळाडू रात्री 8 ते 9 वाजे पर्यंत खेळू शकतील. त्यांना फक्त शुक्रवारी, शनिवारी आणि रविवार बरोबरच सार्वजनिक सुट्टयांच्या दिवसामध्ये फक्त एक तासच व्हिडीओ गेम खेळण्याची परवानगी असेल.
निक्केई आशियानुसार गेमिंग ऑपरेटर्सना नियम प्रसिध्द करणार्या संस्था उपयोगकर्त्यांच्या खर्या नावाने नोंदण्यासाठी जोर देत राहिल्या आहेत. एनपीपीएने 2019 मध्ये कमी वयाच्या लोकांच्या गेमिंगला सुट्टयांच्या दिवशी तीन तास आणि अन्य दिवशी दीड तासा पर्यंत मर्यादीत केले होते.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की चीनचे सरकार युवकांसाठी शिक्षणावर अधिक नियंत्रण ठेवत असल्याने कठिण नियम आता येत आहेत. सप्टेंबर पासून शंघाईमध्ये प्राभमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शी जिनपिंग थॉट ऑन सोशलिझम विद चाइनीज कॅरेक्टर्सला शिकावे लागेल.
बिजिंग शहराने या महिन्यात म्हटले होते की ते अशा विदेशी शैक्षणिक कंटेंटवर प्रतिबंध लावणार आहेत ज्याला अधिकार्यानी यापूर्वी परवानगी दिली नसेल.
अनेक चीनी गेम ऑपरेटर आधी पासूनच वेळेच्या प्रमाणाला मर्यादीत करत होते आणि कमी वयातील खेळाडू सोमवारच्या घोषणेनंतर प्रत्यक्षपणे आपल्या प्लेटफॉर्मवर खर्च करु शकतात.
या महिन्याच्या सुरुवातीला टेनसेंट होल्डिंगने घोषणा केली की ते हळूहळू कमी वयोगटातील खेळाडूंना सुट्टीच्या दिवशी दोन तास आणि अन्य दिवसांमध्ये एक तास पर्यंत मर्यादीत करतील.
गेमिंग कंपनीनी वेबसाईटला सांगितले की ते अधिकार्यांद्वारा घोषीत कठोर दिशानिर्देशांचे पालन करतील. या महिन्यात घोषीत एप्रिल-जून परिणामानुसार 16 वर्षापेक्षा कमी वयातील युवा आणि चीनीमध्ये टेनसेंटच्या खेळाच्या महसूलाचा 2.6 टक्के हिस्सा राहिला आहे.